लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार; साडे सतरा लाखही उकळले, मीरारोडमधील घटना

By धीरज परब | Published: September 19, 2023 12:02 PM2023-09-19T12:02:28+5:302023-09-19T12:02:45+5:30

मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. 

Persistent sexual assault with the lure of marriage; Seventeen and a half lakhs also boiled, the incident in Mira Road | लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार; साडे सतरा लाखही उकळले, मीरारोडमधील घटना

लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार; साडे सतरा लाखही उकळले, मीरारोडमधील घटना

googlenewsNext

मीरारोड - लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक अत्याचार केलाच शिवाय घेतलेला साडे सतरा लाखांचा ऐवज सुद्धा परत केला नाही म्हणून मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित फिर्यादी महिला हि मीरारोड मध्ये राहणारी असून नया नगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तिच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा कनकिया , भैरव रेसिडेन्सी समोरील वासुदेव स्काय टॉवर मध्ये राहणारा आहे . त्याने पीडितेस लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या आणि आरोपीच्या घरी तसेच मध्यप्रदेश येथे नेऊन लैंगिक अत्याचार केले. 

आरोपीने पीडित कडून विविध कारणांनी घेतलेले १५ लाख , २ लाखांची चैन व ५० हजारांचा मोबाईल परत न करता फसवणूक केली . आरोपीने लग्नास नकार देत पोलिसात तक्रार केल्यास पीडित महिलेस व तिच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली . वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित पाटील पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Persistent sexual assault with the lure of marriage; Seventeen and a half lakhs also boiled, the incident in Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.