शेतकऱ्याला पावणे दोन कोटीचा गंडा घालणाऱ्यास दिल्लीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 10:55 PM2021-06-16T22:55:25+5:302021-06-16T22:56:09+5:30

शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विकास सुरींदर कपूर याला साबयर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली.

person arrested from delhi for cheating farmers for rs 1 75 crore | शेतकऱ्याला पावणे दोन कोटीचा गंडा घालणाऱ्यास दिल्लीतून अटक

शेतकऱ्याला पावणे दोन कोटीचा गंडा घालणाऱ्यास दिल्लीतून अटक

Next

तीन दिवस लावला सापळा : विम्याच्या माध्यमातून दुप्पट पैशाचे आमिष

जळगाव : स्टेट बँक लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला एजंट कोड व म्युचिअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून वामन काशिराम महाजन (रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) या शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विकास सुरींदर कपूर (रा.साध नगर, पालम गाव, दिल्ली) याला साबयर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. सलग तीन दिवस सापळा रचल्यानंतर तो हाती लागला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास कपूर व त्याच्या साथीदारांनी अंतुर्ली येथील शेतकरी वामन महाजन यांच्याशी २०१४ तो २२ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वेळोवेळी संपर्क करुन सेवानिवृत्तीचे पैसे विमा कंपनीत गुंतवले तर दुप्पट मिळतील त्याशिवाय कर्जही मिळेल असे सांगून वेळोवेळी महाजन यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला लावले. सहा वर्षात महाजन यांनी तब्बल ३५ वेळा ३५ बँकामध्ये १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपये ऑनलाईन भरले. यात आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी ७ मार्च २०२० रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. नंतर हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग झाला. दरम्यान, संशयिताने बनावट बँक खाते उघडले होत तसेच बनावट सीमकार्डचा वेळोवेळी वापर केला आहे.
 

Web Title: person arrested from delhi for cheating farmers for rs 1 75 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.