Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला; हात उखडून बॅरिकेड्सला लावला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 09:56 AM2021-10-15T09:56:12+5:302021-10-15T10:00:20+5:30

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या ३ कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत.

Person with chopped hand found dead near stage of protesting farmers at Singhu border | Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला; हात उखडून बॅरिकेड्सला लावला

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला; हात उखडून बॅरिकेड्सला लावला

Next
ठळक मुद्देशेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही.युवकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. ज्या युवकाला मारलं त्याचा डावा हात कापण्यात आला होता

नवी दिल्ली – सिंधु बॉर्डर(Sindhu Border) ज्याठिकाणी शेतकरी आंदोलन करत होते त्याठिकाणी एका युवकाची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. युवकाचा हात कापून बॅरिकेड्सला लटकवला आहे. मृतदेह आढळल्यानंतर सिंधु बॉर्डरवर मोठी खळबळ माजली. आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला पोलिसांना मुख्य व्यासपीठाजवळ जाण्यास रोखले परंतु त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेत सामान्य रुग्णालयात पाठवला.

सिंधु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या(Farmers Protest) मुख्य व्यासपीठावर सकाळी हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. मृत युवकाचं वय ३५ वर्ष होतं. युवकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. ज्या युवकाला मारलं त्याचा डावा हात कापण्यात आला होता. युवकावर गुरु ग्रंथ साहिबची बदनामी केल्याचा संशय होता. या हत्येचा आरोप निहंगांवर लावण्यात आला आहे. निहंगांचा आरोप आहे की, युवकाला षडयंत्र म्हणून इथं पाठवण्यात आलं होतं. त्यासाठी त्याला ३० हजार रुपये दिले होते. युवकाने पवित्र गुरु ग्रंथ साहिबचं भंग केला.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या ३ कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ९ महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही. कृषी विधेयकं मागे घ्यावीत अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे. तर विधेयक मागे घेतले जाणार नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार विधेयकात बदल करण्याची सरकारची तयारी आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये संताप

काही दिवसांपूर्वी लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Violence) येथे शेतकरी आंदोलनात एक थार गाडी वेगाने येऊन शेतकऱ्यांना चिरडून पुढे गेली. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये शेतकरी हातात काळे झेंडे घेऊन एकत्र पुढे जात असलेले पाहायला मिळत होते. याचवेळी अचानक पाठीमागून एक गाडी वेगाने पुढे येथे आणि शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाते. त्यानंतर त्यापाठोपाठ दोन आणखी गाड्या वेगाने निघून जातात. या घटनेने नंतर एकच गोंधळ उडतो. शेतकरी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागतात. या घटनेत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Person with chopped hand found dead near stage of protesting farmers at Singhu border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.