दिराने वहिनीच्या डोक्यात केला कुऱ्हाडीने वार; भेदरलेल्या मुलाने सांगितली घटनेचा थरार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:10 AM2021-05-22T08:10:56+5:302021-05-22T08:11:30+5:30

जळगावातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून आरोपी दिराला अटक

A Person Murders his brother wife in Jalgoan. Police Arrested Accuse | दिराने वहिनीच्या डोक्यात केला कुऱ्हाडीने वार; भेदरलेल्या मुलाने सांगितली घटनेचा थरार 

दिराने वहिनीच्या डोक्यात केला कुऱ्हाडीने वार; भेदरलेल्या मुलाने सांगितली घटनेचा थरार 

Next

जळगाव : कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची अमानुषपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता शहरातील पिंप्राळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत घडली. योगिता मुकेश सोनार (वय ३९) असे हत्या झालेल्या महिलेचे तर दीपक लोटन सोनार (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, मृत महिलेच्या मुलासमोर ही घटना झाल्याने त्याने पोलिसांना ही घटना सांगितली.

काय आहे नेमकी घटना?
मयत योगिता सोनार या मयूर कॉलनीत सासू प्रमिला, दीर दीपक आणि मुलगा आर्यन यांच्यासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे यावल येथे अपघाती निधन झाले होते. मुकेश यांच्या निधनानंतर १६ दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते. दरम्यान, त्यांच्यात कौटुंबिक  वाद सुरू होते. शुक्रवारी जेवण झाल्यानंतर दीपक हा घरात भावाच्या काही फाईल्स बघत होता. त्यावरून त्याचा व वहिनीचा वाद झाला अन् संतापलेल्या दीपकने पलंगामागील कुऱ्हाड काढून वहिनी योगिता यांच्या डोक्यात घाव घातले. यात योगिता यांचा जागीच मृत्यू झाला.

दीपकला पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी आरोपी दीपक याला अटक केली आहे. सुनेच्या खुनानंतर सासू प्रमिला या सुन्न झाल्या होत्या. रात्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत कुऱ्हाड ताब्यात घेतली.

 

Web Title: A Person Murders his brother wife in Jalgoan. Police Arrested Accuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस