होमस्टेच्या मालकाकडे सापडले २ हजार अश्लील व्हिडिओ; रुम्समध्ये लावलेला सीक्रेट कॅमेरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:11 PM2022-03-07T12:11:49+5:302022-03-07T12:12:49+5:30
दोन हजाराहून अधिक पर्यटकांच्या वैयक्तिक क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो छुप्या पद्धतीनं जमा केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. आरोपी व्यक्ती Airbnb चा होस्ट असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी दिल्ली-
दोन हजाराहून अधिक पर्यटकांच्या वैयक्तिक क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो छुप्या पद्धतीनं जमा केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे. आरोपी व्यक्ती Airbnb चा होस्ट असल्याचं सांगितलं जात आहे. Airbnb ही एक अमेरिकन कंपनी असून पर्यटकांना उत्तम होमस्ट उपलब्ध करुन देण्याचं काम ही कंपनी करते. तसंच पर्यटनाशी निगडीत इतर सेवाही ऑफर करते. होमस्टेमध्ये येणाऱ्या पर्यटकांची हेरगिरी करणं आण त्यांच्या वैयक्तिक क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आरोप या व्यक्तीवर करण्यात आलेला आहे. संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. Airbnb कंपनीनंही संबंधित प्रॉपर्टीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोपी व्यक्ती अमेरिकेच्या टेक्सास येथील राहणारा आहे.
आरोपी व्यक्ती ५४ वर्षांचा असून त्याचं नाव जय एली असं सांगण्यात येत आहे. त्यानं होमस्टेमध्ये छुपा कॅमेरा लावला होता. ऑनलाइन शॉपिंग साइटवरुन त्यानं हे डिव्हाइस मागवलं होतं. पोलिसांना आरोपीकडून कॅमेरा, लॅपटॉप, टॅबलेट आणि फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपी तब्बल वर्षभर पर्यटकांची रेकॉर्डिंग करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
पीडीतेनं सांगितली आपबिती
१७ वर्षीय बियांका नावाची तरुणी देखील याच होमस्टेमध्ये थांबली होती. या होमस्टेमध्ये राहण्याचा अनुभव एका हॉरर चित्रपटासारखा होता असं तिनं म्हटलं आहे. आरोपी एली याला पोलिसांनी याआधी नोव्हेंबर महिन्यातही अटक केली होती. त्यावेळी ४ प्रकरणांमध्ये आरोपी ठरवण्यात आलं होतं. पण आता त्याच्यावर एकूण १५ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याच्या आरोपासोबतच लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आणि छुप्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक क्षण रेकॉर्ड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.