विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 09:12 PM2020-05-21T21:12:56+5:302020-05-21T21:14:56+5:30
आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०६ आणि ३७७ अन्वये आत्महत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयास्पद मृत्यू झालेल्या आणि कुुटुंबीयांनी दफन केलेेल्या 14 वर्षीय मुलीच्या मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आसामच्या धेमाजी जिल्ह्यातील पोलिसांनी एका 51 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे.
गावकऱ्यांनी १८ मे रोजी आरोपी अकान साकिया याला पकडले. “मुलीचा संशयास्पद परिस्थितीत १७ मे रोजी मृत्यू झाला आणि त्याच रात्री तिच्या कुटूंबियांनी गावाजवळ वाहणाऱ्या सिमेन नदीच्या जवळ दफन केले. "त्यावेळी थोडे गावकरीही उपस्थित होते," असे धनंजय घनवट, धेमाजीचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणाले.
१८ मे रोजी दुपारी काही मच्छीमारांनी आरोपी मुलीच्या शरीरावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहिले. आरोपीने कबरी खोदून मृतदेह बाहेर काढला होता. त्याला पकडले गेले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. “आरोपी मानसिकदृष्ट्या वेडसर दिसत नाही परंतु तो मनोरुग्ण आहे. तो एक हिस्ट्रीशीटर देखील आहे, असे पुढेच घनवट म्हणाले.
आरोपीने दोनदा लग्न केले होते आणि २०१८ मध्ये त्याच्या एका पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्याला दोषी ठरविण्यात आले आणि ते धेमाजी जेलमध्ये शिक्षा भोगत होते. पण कोरोना व्हायरस प्रादुर्भावामुळे तुरुंगातून सोडण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मार्चच्या शेवटी त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. काहींनी असा आरोप केला आहे की, कदाचित त्याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला असावा, ज्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे पुढे घनवट म्हणाले. मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदन करून पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविला असून रिपोर्ट प्रलंबित आहे. “आरोपीने न्यायालयीन कोठडीत आपला गुन्हा कबूल केला आहे,” असे एसपी पुढे म्हणाले.
आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०६ आणि ३७७ अन्वये आत्महत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचा खून केला; मृतदेहाचे तुकडे दोन सुटकेसमध्ये भरून जंगलात टाकले
खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी
वादग्रस्त ट्विट लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक; धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप