Peshawar Suicide Attack: पाकिस्तानमधील जामा मशीदीमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:30 PM2022-03-04T15:30:10+5:302022-03-04T15:33:12+5:30

Peshawar Suicide Attack mosque: पेशावरची राजधानी शहराचे पोलीस अधिकारी (सीसीपीओ) एजाज अहसान यांनी या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी सांगितले की, आता पर्यंत ३० मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत. 

Peshawar Suicide Attack mosque: Massive bomb blast at Jama Masjid in Pakistan; 30 deaths | Peshawar Suicide Attack: पाकिस्तानमधील जामा मशीदीमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 लोकांचा मृत्यू

Peshawar Suicide Attack: पाकिस्तानमधील जामा मशीदीमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 लोकांचा मृत्यू

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जामा मशीदीमध्ये आज आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये कमीतकमी ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. नमाज पठणावेळी आलेल्या गर्दीला लक्ष्य करण्यात आले. या घटनेमध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 

जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. स्फोटानंतर मदतीला पोहोचलेल्या लोकांनी जखमींना मोटरसायकल, कारमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. जिओ न्यूजनुसार पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढले आहे. लेडी रीडिंगच्या हॉस्पिटल प्रवक्त्याने सांगितले की, १० जखमींची हालत गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

पेशावरची राजधानी शहराचे पोलीस अधिकारी (सीसीपीओ) एजाज अहसान यांनी या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी सांगितले की, आता पर्यंत ३० मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत. 

अहसान यांनी सांगितले की, सुरुवातीच्या वृत्तानुसार पेशावरचा भाग ख्वानी बाजारात दोन हल्लेखोरांनी मशीदीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मशीदीच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस मारला गेला आहे. तर दुसरा गंभीर जखमी आहे.

Web Title: Peshawar Suicide Attack mosque: Massive bomb blast at Jama Masjid in Pakistan; 30 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.