ऑनलाइन ऑर्डर केले कीटकनाशक, ते खाऊन झाला मृत्यू! वेबसाईटच्या संचालक, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 07:47 PM2022-01-06T19:47:36+5:302022-01-06T19:48:32+5:30

Suicide Case : वास्तविक, गाझियाबादमधील मसुरी पोलिस ठाण्यात एका भारतीय ई-कॉमर्स वेबसाइटच्या संचालक आणि प्रादेशिक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण अतिशय गंभीर आहे.

Pesticides ordered online, they ate and died! File a complaint against the director and manager of the website | ऑनलाइन ऑर्डर केले कीटकनाशक, ते खाऊन झाला मृत्यू! वेबसाईटच्या संचालक, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

ऑनलाइन ऑर्डर केले कीटकनाशक, ते खाऊन झाला मृत्यू! वेबसाईटच्या संचालक, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Next

गाझियाबाद - जगभरातील लोक ई-कॉमर्स वेबसाइटवरून सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करतात. सुईपासून ते जहाजापर्यंत ऑनलाइन खरेदी केली जाते. पण, वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा वापर कसा होतो, याची जबाबदारीही या शॉपिंग वेबसाइट्सची असेल का? वास्तविक, गाझियाबादमधील मसुरी पोलिस ठाण्यात एका भारतीय ई-कॉमर्स वेबसाइटच्या संचालक आणि प्रादेशिक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण अतिशय गंभीर आहे.

वेबसाइट संचालक आणि प्रादेशिक व्यवस्थापकविरोधात गुन्हा 
गाझियाबादमधील अब्दुल वाहिद या तरुणाने ऑनलाइन विष मागवून त्याचा आत्महत्येसाठी वापर केल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच शॉपिंग वेबसाइटवरून ऑर्डर केलेले विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. आता त्याच्या नातेवाइकांनी वेबसाईटचे संचालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

विष ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि खाल्ल्याने मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, मसुरीच्या खांचा रोडवर राहणारा २४ वर्षीय अब्दुल वाहिद हा कॅब ड्रायव्हर होता. काही काळ त्याचे उत्पन्न फारसे नव्हते आणि फारशी बचतही शिल्लक नव्हती. कोरोनामध्ये लावलेल्या कर्फ्यूमुळे त्याच्याकडे पैशांची कमतरता भासू लागली, त्यामुळे अब्दुल आर्थिक चणचण असल्याने नैराश्यात होता. असे सांगितले जात आहे की, 25 सप्टेंबर 2021 रोजी त्याने एका प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइटवरून कीटकनाशके खरेदी केली. त्याची डिलेव्हरी मिळाली. त्यानंतर अब्दुलने विष प्राशन करून आत्महत्या केली. मरण्यापूर्वी त्याने स्वत: सांगितले की, त्याने ऑनलाइन विष मागवले होते.

ही बाब मृताच्या नातेवाईकांच्या वकिलाने सांगितली
मृत अब्दुलच्या कॅबमध्ये कीटकनाशकाचे रॅपर सापडल्याचे सांगण्यात येत आहे. अब्दुलची प्रकृती खालावल्याने त्याला शहरातील सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अब्दुलचा मृत्यू झाला. त्याचवेळी मृत अब्दुलच्या नातेवाईकांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल
याबाबत वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मसुरी पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी गुन्हा दाखल केला. संचालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Web Title: Pesticides ordered online, they ate and died! File a complaint against the director and manager of the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.