डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घ्या अन् विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्या; उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 06:28 PM2020-08-26T18:28:01+5:302020-08-26T18:48:39+5:30

डीएसके प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवुणकदारांमार्फत याचिका..

Petition to the High Court for possession of DSK's property | डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घ्या अन् विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्या; उच्च न्यायालयात याचिका

डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घ्या अन् विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्या; उच्च न्यायालयात याचिका

Next
ठळक मुद्देचांगल्या परताव्याच्या आमिषाने डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक

पिंपरी : गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी डीएसके प्रकरण तातडीने निकाली काढावे तसेच डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना पैसे द्यावे , अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. डीएसके प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवणूकदारातर्फे अ‍ॅड. चंद्रकांत बीडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
      चांगल्या परताव्याच्या आमिषाने डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी डीएसके यांना त्याच्या कुटुंबियासह अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गेल्या अनेक  महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. हे प्रकरण निकाली निघावे अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून केली जात आहे. अ‍ॅड. बीडकर यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यातील न्यायालयात खटला लवकर निकाली निघावा याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आत बीडकर यांनी गुंतवणूकदारांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात केली आहे. या प्रकरणात गुंतवणूकदारांचे १ हजार १५३ कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे तसेच हे प्रकरण तातडीने निकाली काढावे, डीएसके यांच्या ड्रीम सिटी प्रोजेक्ट म्हाडाला देऊन येणा-या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. सरकारने जप्त केलेल्या डीएसके यांच्या मालमत्तेचा ताबा अद्याप मिळालेला नसल्याने त्याचा लिलाव करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करावा. असेही याचिकेत नमुद करण्यात आल्याचे बीडकर यांनी सांगितले. 

Web Title: Petition to the High Court for possession of DSK's property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.