मुख्याधिकाऱ्यांसमक्ष घेतले अंगावर पेट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 09:37 PM2021-01-20T21:37:12+5:302021-01-20T21:37:21+5:30

अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत जयस्तंभ ते दुरानी चौक ते गुजरीबाजार दरम्यानच्या रस्ता बांधकामात मुख्याधिकारी, नगरसेवक व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर बुधवारी एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला.

Petrol on the body taken before the chief | मुख्याधिकाऱ्यांसमक्ष घेतले अंगावर पेट्रोल

मुख्याधिकाऱ्यांसमक्ष घेतले अंगावर पेट्रोल

googlenewsNext

परतवाडा - अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत जयस्तंभ ते दुरानी चौक ते गुजरीबाजार दरम्यानच्या रस्ता बांधकामात मुख्याधिकारी, नगरसेवक व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समोर बुधवारी एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर पोलिसांच्या निर्देशानंतर तो इसम पोलीस ठाण्यात पोहचला.

विशेष रस्ते विकास निधीअंतर्गत दोन-चार दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले. यासाठी त्याने रस्त्या मोकळा करण्यासाठी साईडला असलेले अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण काढण्यात आले. दुरानी चौकातील एका पेट्रोलपंपजवळ गजराजसह अधिकारी पोहचले. तेथे पेट्रोलपंपशी संबंधित एका इसमाने गजराज न चालविण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली. पेट्रोलपंपलगत रस्त्यावर डांबर नको. हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे तेथे पेव्हींग ब्लॉक बसवलेत. अशी आग्रही मागणी मुख्याधिकाऱ्यांपुढे ठेवली. यादरम्यान शाब्दिक चकमकही घडली. नगरपालिकेने टाकलेली चुण्याची लाईन बघून पेट्रोलची बाटली त्या इसमाने जवळ घेतली. त्यातील काही पेट्रोल अंगावरसुद्धा घेतले. या संपूर्ण घटनाक्रमाचे नगरपरिषदेकडून व्हिडीओ शुटींगही केले गेले.

नगरपरिषदेला दंड
यापूर्वी मुख्याधिकारी गणेश देशमुख व एसडीओ अरुण डोंगरे हे असताना याच दुरानी चौकातील अतिक्रमण काढण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला होता. तेव्हा नगर परिषदेचे काही कर्मचारी गंभीर जखमीही झाले होते. संबंधितांनी हे प्रकरण न्यायालयात पोहचविले. यात न्यायालयाने लाखो रुपयांची पेनॉल्टी नगरपरिषदेवर ठोकली होती.

रस्त्याचा मध्य काढा
रस्त्याचे काम करताना रस्त्याचा मध्य काढा. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुने सारखे अंतर घेऊन मग नगरपरिषदेने गजराज फिरवावा. अतिक्रमण काढताना कुठलाही भेदभाव करू नये. सरसकट एका लाईनमध्ये अतिक्रमण काढावे, अशी न्याय्य मागणी नागरिकांनी केली आहे.


पेट्रोलपंपाशी संबंधित व्यक्तीने शाब्दिक वाद गालत अंगावर पेट्रोल घेण्याचाही प्रयत्न केला. संबंधितास असलेले आवश्यक दस्तऐवज सादर करण्यास सुचविले आहे. घटनेच्या अनुषंगाने लिखित तक्रार केलेली नाही. दस्तऐवज बघून पुढील कारवाई निश्चित करू.
- राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, अचलपूर नगरपालिका

 

Web Title: Petrol on the body taken before the chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.