Petrol Pump ATM Fraud: पेट्रोल पंपांवर एटीएमद्वारे पैसे देत असाल तर सावधान; तुमच्या सोबत असा प्रकार घडलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:46 AM2022-03-15T11:46:54+5:302022-03-15T11:49:28+5:30

ATM Fraud on Petrol Pump: ऑनलाईन व्यवहारांना देखील धोका आहे. सायबर क्राईम करणारे, स्कॅमर्स, हॅकर आदी तुमची गोपनिय माहिती मिळते का हे पाहत असतात. यासाठी एटीएममध्ये स्कॅमर लावण्याचे प्रकार होत असतात.

Petrol Pump ATM Fraud: Be careful if you are paying through ATM at petrol pumps; Thugs weave 'nets' cloning of ATM and password | Petrol Pump ATM Fraud: पेट्रोल पंपांवर एटीएमद्वारे पैसे देत असाल तर सावधान; तुमच्या सोबत असा प्रकार घडलाय का?

Petrol Pump ATM Fraud: पेट्रोल पंपांवर एटीएमद्वारे पैसे देत असाल तर सावधान; तुमच्या सोबत असा प्रकार घडलाय का?

googlenewsNext

कोरोना काळापासून देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. हल्ली लोक खिशात पैसे ठेवत नाहीत, तर ते बँकेतच ठेवून एटीएम किंवा युपीआयद्वारे, कोड स्कॅन करून दुकान, व्यापारी आस्थापनांमध्ये पैसे दिले जातात. हे जरी सोपे वाटत असले तरी जागोजागी ठग, महाठग बसलेले असल्याने असे व्यवहार करताना सावधानतेने करावे लागणार आहेत. 

ऑनलाईन व्यवहारांना देखील धोका आहे. सायबर क्राईम करणारे, स्कॅमर्स, हॅकर आदी तुमची गोपनिय माहिती मिळते का हे पाहत असतात. यासाठी एटीएममध्ये स्कॅमर लावण्याचे प्रकार होत असतात. आता तर दुकाने, पेट्रोल पंपांवर उपलब्ध असलेल्या स्वॅप मशीनवर देखील स्कॅमर लावले जात असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. नोएडा पोलिसांनी अशा एका टोळीला पकडले आहे. ते पेट्रोल पंपावर एटीएम किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे देणाऱ्या लोकांचे कार्ड क्लोन करून त्यांच्या खात्यातून पैसे काढत होते. 

या टोळीतील ठग स्कॅनर मशिन स्कॅन करून एटीएम कार्डचा क्लोन बनवतात आणि चोरी किंवा कॅमेऱ्याच्या सहाय्याने ग्राहकाने टाकलेला पासवर्ड बघून खात्यातून पैसे काढायचे. अटक केलेल्या आरोपींचे म्हणणे आहे की त्यांच्या टोळीतील अनेक सदस्य नोएडासह एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर सेल्समन म्हणून काम करत आहेत. या टोळीतील तीन सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून अनेक सदस्य फरार आहेत.

नोएडा पोलिसांनी सांगितले की, माहितीच्या आधारे सोमवारी तिघांना अटक केली. चौकशीत या लोकांनी सांगितले की, पेट्रोल पंपावर इंधन भरण्यास येणाऱ्या लोकांनी आपले एटीएम कार्ड सेल्समनला पैसे भरण्यासाठी दिले असता, आरोपी त्यांच्याजवळ असलेल्या स्कॅनर मशीनने एटीएम कार्ड स्कॅन करायचे आणि त्याच्या मदतीने एटीएम क्लोन करायचे. जर पासवर्ड टाकताना दिसला नाही तर ते त्या ग्राहकाला पुन्हा पुन्हा पासवर्ड टाकण्यास सांगायचे किंवा कॅमेरामध्ये दिसेल अशा ठिकाणी उभे राहून त्याला पासवर्ड टाकण्यास सांगायचे. यानंतर त्या क्लोन कार्डद्वारे मुंबई, कोलकातामध्ये ते पैसे काढले जात होते. 

Web Title: Petrol Pump ATM Fraud: Be careful if you are paying through ATM at petrol pumps; Thugs weave 'nets' cloning of ATM and password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.