पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येतील आरोपीसोबत भाजपा नेता, PHOTO व्हायरल झाल्यानंतर केला असा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 08:08 PM2020-07-18T20:08:21+5:302020-07-18T20:10:07+5:30
शिखर अग्रवाल हे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसोबत फोटोत दिसत आहेत. अग्रवाल याला एका कार्यक्रमास जिल्हा महामंत्री बनवण्यात आले.
बुलंदशहरमध्ये कथित भडकलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांना गोळ्या घालून मारण्यात आले. सुबोध कुमार त्या हिंसाचाराच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आले होते. तेव्हा हत्येची घटना घडली आहे, ज्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी एक भाजपा नेता शिखर अग्रवाल याला सर्टिफिकेट देतानाचा फोटो व्हायरल झाला. पंतप्रधान जनकल्याणकारी योजनेअंतर्गत जागरूकता अभियान जिल्हा महामंत्री अग्रवाल याला बनवण्यात आले आहे.
शिखर अग्रवाल हे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीसोबत फोटोत दिसत आहेत. अग्रवाल याला एका कार्यक्रमास जिल्हा महामंत्री बनवण्यात आले. हा कार्यक्रमात जिल्ह्याध्यक्ष मनीष सिसोदिया यांनी अग्रवाल याला आपल्या हातांनी प्रमाणपत्र दिले. त्याचा फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या शिखर अग्रवाल यांच्यासोबतच्या जिल्हाधिकारी सिसोदियांचे फोटो समोर आल्यानंतर आरोपी आणि त्या संघटनेसोबत काही संबंध राहिले नाहीत असे सिसोदिया म्हणाले. सिसोदिया म्हणाले, आज मला कळलं की शिखर अग्रवाल एका संस्थेचा पदाधिकारी आहे. त्यांनी मला पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बोलावले. या संस्थेशी माझा काहीच संबंध नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'
मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला