दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या फरार आरोपींची छायाचित्र प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:49 PM2023-11-23T16:49:20+5:302023-11-23T16:49:52+5:30
दोन फरार आरोपीच्या शोधात तुळींज पोलीस, माहिती देणार्यास बक्षीस
मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा:- शहरामध्ये रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्या दोन अल्पवयीन मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन फरार आरोपींचा शोध तुळींज पोलीस करत आहे. दोन्ही आरोपींची सीसीटीव्हीत कैद झालेले छायाचित्रे प्रसिद्ध करून आरोपींची माहिती देण्याचे आव्हान करून त्यांची योग्य माहिती देणार्यास पोलिसांनी बक्षिसही जाहीर केले आहे.
नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन घडलेल्या घटनांबाबत दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिली घटना ५ ऑक्टोबरला तर दुसरी घटना १५ नोव्हेंबरला घडली आहे. यामध्ये ७ आणि ९ वर्षांच्या मुलींचा दोन आरोपींनी विनयभंग करून लैंगिक अत्याचार केला आहे. या मुलींनी घडलेली घटना घरच्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती तुळींजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन घटनांमुळे पालकांमध्ये घबराट आणि चिंतेचं वातावरण पसरले आहे. पालकांनी आणि मुलींनी सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
कोट
१) या दोन्ही फरार व विकृत आरोपींना पकडण्यासाठी पथके बनवली आहेत. त्यांची छायाचित्रे ठिकठिकाणी लावली आहेत. त्यांची माहिती देणार्यास बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. - शैलैंद्र नगरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)