बापरे! सांगलीत गर्भधारणा होऊ नये म्हणून घोडीला शारिरीक इजा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 08:27 PM2020-10-20T20:27:55+5:302020-10-20T20:28:45+5:30

Crime News : पोलिसांत गुन्हा दाखल : ॲनिमल राहत संस्थेकडून उपचार

Physical injury to the horse to prevent pregnancy in Sangli | बापरे! सांगलीत गर्भधारणा होऊ नये म्हणून घोडीला शारिरीक इजा

बापरे! सांगलीत गर्भधारणा होऊ नये म्हणून घोडीला शारिरीक इजा

googlenewsNext
ठळक मुद्दे याप्रकरणी ॲनिमल राहत संस्थेचे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ किशोर पोळे (वय ३२, रा. संगमेश्वरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

सांगली : गर्भधारणा होऊ नये म्हणून घोडीला शारिरीक इजा केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांत अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील इंद्रप्रस्थनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी ॲनिमल राहत संस्थेचे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ किशोर पोळे (वय ३२, रा. संगमेश्वरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोळ यांना इंद्रप्रस्थनगर येथे एक घोडी जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यांना घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ती शर्यतीसाठी सक्षम रहावी, गर्भधारणा होऊ नये, यासाठी अज्ञाताने तिला गंभीर स्वरूपाची इजा केल्याचे दिसून आले. नंतर त्यांनी तिच्यावर उपचार केले. सायंकाळी पोळ यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात पशु संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Physical injury to the horse to prevent pregnancy in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.