फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रस्थापित केले शारीरिक संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:56 AM2021-03-20T10:56:22+5:302021-03-20T10:57:05+5:30

Physical relationship established by threatening महिलेच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Physical relationship established by threatening to make the photo viral | फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रस्थापित केले शारीरिक संबंध

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रस्थापित केले शारीरिक संबंध

Next

महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

अकोला : अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका २४ वर्षीय महिलेला पैशाचे आमिष दाखवून तसेच महिलेचे त्याच्यासोबत असलेले मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याचा धमक्या देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील एका २४ वर्षीय महिलेला पैशाचे आमिष दाखवून तसेच महिलेचे त्याच्यासोबत असलेले मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याचा धमक्या देऊन पीडिताच्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पीडितेने पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. महिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी चंद्रकांत श्रीराम पालखडे (रा. वणी, ता. अकोट) याच्या विरोधात भादंविच्या कलम ४५२, ३७६, ३७६ (२) सहकलम अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०१५ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Physical relationship established by threatening to make the photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.