विकृतीचा कळस, अल्पवयीनाला समोर उभा करून पत्नीशी ठेवायचा शारीरिक संबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 09:46 PM2021-03-14T21:46:51+5:302021-03-14T21:48:22+5:30
Crime News : आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या सुमारास कामक्रीडा करीत असताना अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या शयनकक्षात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे.
अमरावती - शयनकक्षात शेजारच्या अल्पवयीन मुलाला गुपचूप उभे करून त्याच्यासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या ३५ वर्षीय पतीविरुद्ध खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (sexual relations) खुद्द पत्नीने शनिवारी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबीती कथन केली. (the physical relationship with the wife by keeping the minor in front)
खोलापुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात पतीविरुद्ध भादंविचे कलम ३५४ (क) सहकलम १२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर मुलगा हा या दाम्पत्याच्या घराशेजारी राहतो. आई-वडील दगावल्याने अनेक वर्षांपासून सदर मुलाकडे आरोपी पती व त्याची पत्नीने लक्ष दिले. त्याच्या संगोपनासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, सदर महिलेला त्याचा मुलासमान लळा आहे. या दाम्पत्यालाही तीन अपत्ये आहेत.
दरम्यान, आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या सुमारास कामक्रीडा करीत असताना अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या शयनकक्षात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे. मामा कशासाठी नेतात, हे प्रारंभी त्याला कळतदेखील नव्हते. दुसरीकडे पत्नीलाही हा प्रकार माहिती नव्हता. एके दिवशी महिलेला सदर मुलाला घरात असल्याचे निदर्शनास आले आणि ती हादरलीच. पतीला याबाबत विचारणा केल्यावर त्याने त्याची ही विकृती कथन केली.
पोलिसांत धाव
आपले खासगी आयुष्य पतीच दुसऱ्यापुढे, अर्थात ज्याला मुलासमान वागवित आहोत, त्याच्यापुढे उघड करीत असल्याचे लक्षात येताच महिलेला प्रचंड धक्का बसला. त्या सरळमार्गी जीवन जगणाऱ्या महिलेने थेट खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.
मनोविकृती की मालिकांचा परिणाम?
समाजात जे घडते, त्याचे दर्शन माध्यमांवर होते की त्याच्या उलट होते, याबाबत भिन्न मतप्रवाह आहेत. मात्र, वरवर सरळमार्गी जीवन जगणाऱ्या या कुटुंबातील प्रमुख असलेला पती हा वाहिनीवरील मालिकांनी प्रभावित होऊन या प्रकाराला चटावला असावा, असा अंदाज या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.