कबुतर जा..जा! तुरुंगात कबुतराच्या माध्यमातून पोहोचवले जात होते ड्रग्ज, पंखांमध्ये दडलं होतं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:46 PM2023-01-09T22:46:53+5:302023-01-09T22:50:21+5:30
ड्रग्जने भरलेली छोटी पिशवी घेऊन जाणारे कबुतर कॅनडाच्या तुरुंगात पकडण्यात आले आहे.
ड्रग्जने भरलेली छोटी पिशवी घेऊन जाणारे कबुतर कॅनडाच्या तुरुंगात पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या महिन्यात २९ डिसेंबर रोजी ब्रिटिश कोलंबियाच्या अॅबॉट्सफोर्ड जेलमध्ये घडली होती. धक्कादायक म्हणजे कबुतराला एका लहान पिशवीसह पकडण्यात आले, ज्यामध्ये क्रिस्टल मेथ सापडले आहे.
ग्लोबल न्यूजशी बोलताना कॅनेडियन सुधारक संघाचे पॅसिफिक क्षेत्राचे अध्यक्ष जॉन रँडल म्हणाले, "पॅसिफिक इन्स्टिट्यूशनमध्ये एक कबूतर भिंतींच्या आत लपलं होतं आणि त्याच्याकडे एक लहान पॅकेज असल्याचे दिसलं, जे बॅकपॅक असल्याचं दिसलं. पक्षी घेऊन जात असलेल्या बॅकपॅकमध्ये क्रिस्टल मेथ ड्रग्ज लपवलेलं होतं"
कबुतराच्या पाठीवर होते एक छोटेसे पॅकेट
कबुतर जिथे बसलं होतं तिथं कैद्यांचं युनिट होतं. दररोज कैदी या अंगणात फिरण्यसाठी खेळ खेळण्यासाठी किंवा ताजी हवा घेण्यासाठी येतात. यादरम्यान, अधिकाऱ्यांना एक तपकिरी पक्षी दिसला, ज्याच्या पाठीवर एक लहान पॅकेट होतं. अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर कबुतरला पकडण्यात आलं. अथक प्रयत्नांनंतर कबुतरावर बांधण्यात आलेलं पाकीट काढण्यात आलं आणि कबुतराला मुक्त करण्यात आलं.
३० ग्रॅम क्रिस्टल मेथ ड्रग सापडलं
अधिकारी जॉन रँडलच्या म्हणण्यानुसार, कबुतराच्या पाठीतून मिळवलेल्या मिनी-बॅकपॅकमध्ये अंदाजे ३० ग्रॅम क्रिस्टल मेथ होते, जे त्याला अत्यंत व्यसनाधीन मानले जाते. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, पक्ष्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. ते म्हणाले की, तस्करी करताना कबुतरला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेथॅम्फेटामाइनला मेथ म्हणतात. त्याच्या स्फटिकाला क्रिस्टल मेथ म्हणतात. हे आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेसाठी उत्तेजक म्हणून कार्य करते. हे मध्यभागी आणि मणक्यामधील त्या महत्त्वपूर्ण भागाची क्रियाशीलता वाढवतं.