गार्गी कॉलेज लैंगिक शोषणाचा सीबीआय तपासासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:16 PM2020-02-12T18:16:47+5:302020-02-12T18:19:58+5:30
काहींनी विद्यार्थींनी वाईट भावनेने स्पर्श केला. काहींनी अश्लिल इशारे केले. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या विद्यार्थिनी रडू लागल्या.
नवी दिल्ली - नवी दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये अलीकडेच खळबळजनक प्रकार घडला. कॉलेजच्या वार्षिक महोत्सवातील एका कार्यक्रमात जबरदस्तीने एका टोळल्याने प्रवेश करून महाविद्यायीन तरुणींचा विनयभंग केला. तसेच या टोळक्यातील काहींनी विद्यार्थिनींसमोर हस्तमैथूनही केले. हा धक्कादायक प्रकार नवी दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये घडला. या वेळी सुरक्षा रक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे विद्यार्थिनींने म्हणणे आहे. या घटनेमुळे राजधानी दिल्लीत असंतोषाची लाट उसळली आहे. याप्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
PIL filed in the Supreme Court seeking a CBI probe in the recent incident in Delhi University’s all-women Gargi College. The Gargi College students have alleged sexual assault by outsiders. pic.twitter.com/zGEBaO4V7X
— ANI (@ANI) February 12, 2020
नवी दिल्लीतील गार्गी महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवात कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. ६ फेब्रुवारीला या महोत्सवात प्रसिद्ध गायक, कलाकार जुबिन नौटियाल याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दुपारी ३ वाजल्यानंतर गर्दी वाढत गेली. या गर्दीचा फायदा घेत कॉलेजमध्ये कार्यक्रम सुरू असताना कॅम्पसमधून काही बाहेच्या लोकांनी कॉलेजच्या गेटमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. या टोळक्यात अनेक मध्यम वयाचे मुलं होती. त्यापैकी काही आमच्यासमोर थेट हस्तमैथुन करत होते, अशी माहिती या कॉलेजच्या या विद्यार्थिनीने दिली.
काहींनी विद्यार्थींनी वाईट भावनेने स्पर्श केला. काहींनी अश्लिल इशारे केले. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या विद्यार्थिनी रडू लागल्या. हे टोळके २०० ते ३०० लोकांचे होते. काहींनी शर्टची बटणं उघडली तर काहींनी संधी साधत हस्तमैथुन करणे सुरू केले. काहीजण धक्के मारत होते, स्पर्श करत होते. काही लोक महिलांच्या वॉशरुमपर्यंतही आले. त्यांनी बाहेरून कडीही लावली अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली. विशेष म्हणजे पोलीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही. मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली असता उलट त्यांनी विद्यार्थिनींना ओरडत तुम्ही इथे का आलात ? असं विचारले.