‘त्या’ मुलाची सुखरूप सुटका, खंडणी मागणारे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 01:46 AM2018-11-10T01:46:46+5:302018-11-10T01:47:04+5:30
थेरगाव येथे राहणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाच्या पाच वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सुफियान नासिर खान असे बालकाचे नाव आहे.
पिंपरी - थेरगाव येथे राहणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाच्या पाच वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. सुफियान नासिर खान असे बालकाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा अपहरणकर्त्यांना बुधवारी वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शकील सलीम खान (वय ३२, रा. मुबई), शारुख मिरज खान (वय २६, वाल्हेकरवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. चार आॅक्टोबरला दुचाकीवरून आलेल्या एकाने सुफियानला नेले. सुफियान बेपत्ता झाल्याची फिर्याद नासिर झाकीर खान यांनी पोलिसांकडे दिली. दुसºया दिवशी अपहरणकर्त्याने तुमहारा तडका हमारे कबजे मे है, अगर वो सही सलामत चाईए तो पाच लाख रुपये दो असे फोनवरून धमकावले. त्या वेळी खंडणीसाठी अपहरण झाले असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तपास पथके तयार केली. एकाने मुलाला नेले तर दुसरा येथून त्याला मदत करीत होता. आरोपी मोहम्मद याने मुलाला शिक्रापूर, लोणावळा आणि
वसई, विरार येथे नेले होते. पोलिसांनी दुसरा आरोपी शाहरुख यास ताब्यात घेतले होते़ त्याला बरोबर घेऊन पोलीस पथक दुसºया आरोपीच्या मागावर होते.
खंडणीची रक्कम देण्याची तयारी दाखऊन आरोपीला बोलावण्यात आले. सात आॅक्टोबरला आरोपी मुलाला घेऊन चिंचवड येथे खंडणीची रक्कम नेण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडून मुलाची सुखरूप सुटका केली.
खंडणीसाठी अपहरण करणारे दोन्ही आरोपी नात्याने साडू आहेत. त्यातील आरोपी शाहरुख खान याचे मुलाच्या आईच्या ब्युटी पार्लर शेजारी अंडी विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे आरोपी मुलाच्या आईवडिलांच्या ओळखीचे आहेत. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे माहीत असल्याने त्यांनी मुलाच्या अपहरणाचा प्लॅन रचला होता़ तो अपयशी ठरला. पोलिसानी त्यांना जेरबंद केले.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त
नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, तसेच दत्तात्रय सणस, बिभीषण कण्हेरकर, रमेश गायकवाड, प्रमोद भांडवलकर, मधुकर चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली़