अजमेरहून आणलेले पिस्तूल ३० हजारांत करणार होते विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 20:54 IST2019-04-01T20:46:58+5:302019-04-01T20:54:05+5:30
पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मोबाइलची कॉल डिटेल काढण्यास सुरुवात केली असून, ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, याबाबत माहिती काढली जात आहे.

अजमेरहून आणलेले पिस्तूल ३० हजारांत करणार होते विक्री
अमरावती - राजस्थान येथील अजमेरहून आणलेले पिस्तूल अमरावतीत ३० हजारांत विक्री करण्याचा बेत आरोपींचा होता अशी माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना, अमरावती शहरातील चित्रा चौकातून पोलिसांनी पिस्तूलसह जिवंत काडतूस व चाकू जप्त केला. पिस्तूलसारखे शस्त्र अमरावतीत सापडल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. याप्रकरणात पोलिसांनी पवन राजाभाऊ देशमुख (२१ रा. शिक्षक कॉलनी, चांदूर बाजार) व मोहम्मद इमरान मोहम्मद मोहम्मद जमील (३०, रा. नूरनगर, अमरावती) या दोन आरोपींना अटक केली आहे.
आरोपींनी हे पिस्तूल व काडतूस अजमेरहून दहा हजारांत विकत घेतले. त्याचे डीलिंग अमरावतीमधील एका व्यक्तीसोबत करण्यात आले. चित्रा चौकात पिस्टलचे डीलिंग होणार होते. त्यापूर्वी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मोबाइलची कॉल डिटेल काढण्यास सुरुवात केली असून, ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, याबाबत माहिती काढली जात आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.