अमरावतीत होणार होती श्याम मानव यांची हत्या; एटीएसची न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:22 AM2018-09-04T03:22:42+5:302018-09-04T03:23:16+5:30

पांगारकरने अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्याने अमरावतीत रेकीही केल्याचे तपासात उघड झाले. श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात.

plan to murder of Shyam Manav in amravati, ATS court information | अमरावतीत होणार होती श्याम मानव यांची हत्या; एटीएसची न्यायालयात माहिती

अमरावतीत होणार होती श्याम मानव यांची हत्या; एटीएसची न्यायालयात माहिती

Next

मुंबई : पांगारकरने अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्याने अमरावतीत रेकीही केल्याचे तपासात उघड झाले. श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात. पण विदर्भात ते सॉफ्ट टार्गेट ठरु शकतात, असा विचार करून पांगारकरने अमरावतीची निवड केली होती, अशी माहिती एटीएसने सोमवारी न्यायालयात दिली.
३१ आॅगस्टला एटीएसने पांगारकरला सोबत घेऊन अमरावतीत रेकी केलेले ठिकाण गाठले. तेथे पंचनामा केल्याचे न्यायालयात सांगितले. तो पंचनामाही न्यायालयात सादर केला. त्याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर ३१ तारखेला एटीएसच्या हाती लागला. त्यात तो अमोल काळेच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्याचे एटीएसच्या पथकाने न्यायालयात सांगितले. त्याने काळेला केलेले संदेशही एटीएसला मिळाले. गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या कर्नाटकच्या विशेष पथकाकडून पांगारकरबाबत माहीती मागविण्यात आली होती. त्यात विशेष पथकाने अटक केलेल्या अन्य आरोपींजवळून जप्त केलेल्या डायरीत पांगारकरच्या नावाचा उल्लेख असल्याचेही यावेळी नमूद केले.
पांगारकरने जालना येथे स्फोटक प्रकरणातील अन्य आरोपींसह काळेला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली आहे. पांगारकरने स्वत:ही ते प्रशिक्षण घेतले. यासाठीची आर्थिक रसद पांगारकरने पुरवली होती.

खात्यातील रकमेचा आकडा चढा
एटीएसने पांगारकरच्या तीन बँक खात्यांचा आर्थिक व्यवहार मिळाला आहे. यामध्ये बँक आॅफ महाराष्ट्रच्या २०१७ ते २०१८, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या २०१० ते २०१८ आणि सुंदरलाल सावजी अर्बन को. आॅप. बँकेतील २००६ ते २०१८ मधील आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे, असे एटीएसने न्यायालयात सांगितले. त्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसा आला-गेला, तसेच मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.

प्राजी म्हणून प्रसिद्ध : पांगारकर हा प्राजी म्हणूनही सर्वांच्या परिचयाचा होता. याच नावाने तो वावरत होता.
जालन्यात पाच गुन्हे : पांगारकर विरुद्ध १९९८ पासून ते २००५ पर्यंत जालना येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात उघड झाली. यात दंगल घडविणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

वैभव राऊतला दिली दुचाकी
पांगारकरने बनावट वाहन क्रमांक असलेली दुचाकी दिल्याचेही तपासात समोर आले. या दुचाकीबाबतही अधिक तपास सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.
कुटुंबीयांसोबत ५ मिनिटे : राऊतच्या पत्नीसह कळसकर, पांगरकर, गोंधळेकर यांच्या नातेवाईकांना पाच मिनिटे बोलण्यासाठी परवानगी मिळाली होती.

जप्त केलेली स्फोटकेच
नालासोपाऱ्यातून जप्त केलेल्या साहित्याबद्दल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल एटीएसला मिळाला असून त्यात ही स्फोटके असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एटीएसच्या कारवाईला आणखी बळ मिळाले आहे. जालन्यातील ज्या फार्महाऊसवर आरोपींनी बॉम्ब तयार केले आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले त्या फार्महाऊसवरील नमुने घेऊन तही एटीएसने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविले आहेत. तसेच पांगारकरच्या हस्ताक्षराचे नमुने तसेच आवाजाचे नमुनेही घेतले आहेत, असा तपशील दिला.

Web Title: plan to murder of Shyam Manav in amravati, ATS court information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.