पत्ते खेळणाऱ्या उनाडांना हटकले म्हणून मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 04:54 PM2021-11-05T16:54:10+5:302021-11-05T16:54:56+5:30

एका रहिवाश्यास व त्याच्या मुलास मारहाण करणाऱ्या चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

playing cards were beaten up for being stubborn | पत्ते खेळणाऱ्या उनाडांना हटकले म्हणून मारहाण 

पत्ते खेळणाऱ्या उनाडांना हटकले म्हणून मारहाण 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदरच्या गणेश देवल नगर मधील शिमला गल्ली येथे मोकळ्या सरकारी जागेत पत्ते खेळात बसणाऱ्यांना येथे पत्ते खेळू नका सांगितल्याचा राग येऊन एका रहिवाश्यास व त्याच्या मुलास मारहाण करणाऱ्या चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशोककुमार मिश्रा हे रिक्षा चालवतात व गणेश देवल नगर मधील शिमला गल्लीत राहतात. ५ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घरा जवळील मोकळ्या सरकारी जागेत काहीजण पत्ते खेळत होते .  मिश्रा यांनी त्यांना, येथे पत्ते खेळु नका असे सांगीतले असता त्यांना त्याचा राग आला व त्यानी तू पोलिसांचा खबरी आहेस सांगून शिवीगाळ करत मारहाण सुरु केली . 

मिश्रा यांचा मुलगा आलोक हा वाचवण्यास मध्ये गेला असता त्याला देखील मारहाण करत राज तिवारी याने लोखंडी रॉडने डोक्यात मारले . ह्या घटनेमुळे शेजारी - पाजारी आणि मिश्रा यांची पत्नी धावून आल्या नंतर बाप - लेखास त्या चौघा उनाडांच्या तावडीतून सोडवण्यात आले . अलोक हा जखमी झाला असून या प्रकरणी राज तिवारी , आकाश सह अन्य दोघांवर भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: playing cards were beaten up for being stubborn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.