Breaking: PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीची धाड; आमदार हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रूप रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 12:37 PM2021-01-22T12:37:36+5:302021-01-22T12:38:10+5:30
PMC Bank Scam : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शुक्रवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी धाडी टाकल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शुक्रवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी धाडी टाकल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. ईडीने या प्रकरणी या भागातील प्रसिद्ध विवा ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. त्यामुळे या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या निमित्ताने ही कारवाई केली असल्याचीही चर्चा सुरू आहे.
ED conducts searches on premises of Hitendra Thakur owned Viva group, in Mumbai in connection with Yes Bank & PMC Bank Scam. ED has traced money trail b/w Pravin Raut & Thakur family: ED Officials
— ANI (@ANI) January 22, 2021
Raids underway in Mira Bhayandar, Vasai-Virar; around 6 premises being raided pic.twitter.com/WzbKJpGjFJ