PMC बँक घोटाळा : ईडीने केली ३८३० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 07:26 PM2019-10-14T19:26:11+5:302019-10-14T19:26:32+5:30
३८३० कोटींपेक्षा अधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे.
मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) घोटाळ्या प्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) पीएमसी बँक अधिकारी, एचडीआयएलचे संचालक आणि प्रमोटर्स यांची ३८३० कोटींपेक्षा अधिक स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे.
पीएमबी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवा यांना ३ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे. पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंह यांच्या खात्यात ईडीला दहा कोटी रुपये सापडले आहेत, त्यालाही अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत शेकडो कोटीच्या संपत्तीचा उलगडा झाला आहे. ईडी लंडन आणि दुबईमधील मालमत्तांचाही शोध घेत आहे. तेथील मालमत्तांचा वाधवा यांच्याशी काही संबंध आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे.
ED seized / frozen and identified movable and immovable assets worth more than ₹ 3830 crores owned by M/s Housing Development and Infrastructure Limited (HDIL), its Directors / Promoters, PMC Bank officials and others related entities in the PMC Bank fraud case.
— ED (@dir_ed) October 14, 2019
मुंबई - PMC बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने पीएमसी अधिकारी, एचडीआयएलचे संचालक आणि प्रोमोटर्स यांची ३८३० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता केली जप्त https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 14, 2019