Pnb Scam : मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 09:07 PM2018-11-08T21:07:12+5:302018-11-08T21:07:50+5:30
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगहून परत आलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली.
मुंबई - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीचा सहकारी दीपक कुलकर्णीला कोर्टाने १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला कोलकात्यातून ५ नोव्हेंबरला विमानतळावरून अटक करण्यात आली होती. दीपक कुलकर्णी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयनं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगहून परत आलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली.
Deepak Kulkarni an associate of Mehul Choksi who was arrested at Kolkata Airport on 5.11.2018, has been granted ED custody till 12.11.2018, by Hon'ble Court in Mumbai.
— ED (@dir_ed) November 8, 2018