PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:31 PM2020-05-11T18:31:53+5:302020-05-11T18:34:56+5:30

PNB Scam : लंडनच्या वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास ही सुनावणी सुरू होईल  म्हणजेच ती भारतात साडेसहा वाजता होईल.

PNB Scam: Hearing on fugitive Nirav Modi's extradition case begins in London pda | PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी

PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी

googlenewsNext
ठळक मुद्देपीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदीच्या प्रत्यर्पणाच्या सुनावणीला लंडनमध्ये आजपासून सुरुवात होणार आहे.लंडनमधील क्राउन प्रॉसिस्यूशन सर्व्हिस माध्यमातून अधिकारी भारतातूनच संपर्क साधतील.

नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीविरोधात कडक कारवाई सुरू झाली आहे. 13,000 कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदीच्या प्रत्यर्पणाच्या सुनावणीला लंडनमध्ये आजपासून सुरुवात होणार आहे. ही सुनावणी ५ दिवस चालणार आहे. ईडी-सीबीआयच्या म्हणण्यानुसार, लंडनच्या वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास ही सुनावणी सुरू होईल  म्हणजेच ती भारतात साडेसहा वाजता होईल.

लॉकडाऊनमुळे भारतीय अधिकारी जाणार नाहीत
यावेळी लॉकडाऊनमुळे ईडी आणि सीबीआय अधिकारी जाऊ शकणार नाहीत. लंडनमधील क्राउन प्रॉसिस्यूशन सर्व्हिस माध्यमातून अधिकारी भारतातूनच संपर्क साधतील. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार नीरव मोदी यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकते.

Poonam Pandey Arrest: वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेला मुंबईत अटक

 

धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

 

खाकीतल्या माणुसकीला सलाम; या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी!

गेल्या सुनावणीदरम्यान न्या. गूजी म्हणाले, 'काही तरुंग व्यक्तिगत पातळीवर सुनावणीसाठी हजर केले जात आहे म्हणून मी वैंड्सवर्थ  जेलला 11 मेपासून मोदीला वैयक्तिकरीत्या खटल्यासाठी हजर राहण्याचे निर्देश देईन. जर हे शक्य नसेल तर लाईव्ह लिंकद्वारे त्याच्या सुनावणीसाठी हजर करण्याचा एक पर्याय असेल. सुनावणीदरम्यान, मर्यादित संख्येने कायदेशीर प्रतिनिधी थेट न्यायालयात हजर असतील, तर साक्षीदार व्हिडिओ कॉलद्वारे साक्ष देतील. सोमवारपासून सुरू होणारी सुनावणी पाच दिवस चालणार आहे.


नीरव मोदी घोटाळ्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये तो भारतातून पळाला, नीरव मोदीसह त्याचा मामा मेहुल चोकसी यांचेही नाव घोटाळ्यात होते. गेल्या वर्षी जेव्हा नीरव मोदी लंडनमध्ये दिसला होता, तेव्हा मार्चमध्ये त्याला मेट्रो स्टेशनवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात बंद आहे. दरम्यान नीरव मोदीने ५ वेळा जामिनासाठी प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी कोर्टाने त्यांना नकार दिला. भारताच्या तपास अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणात हा निर्णय भारताच्या बाजूने येईल.

Web Title: PNB Scam: Hearing on fugitive Nirav Modi's extradition case begins in London pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.