PNB Scam: "तुझ्यासाठी मुंबईचा तुरुंगच योग्य", लंडनमधील कोर्टाने दिले नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश
By बाळकृष्ण परब | Published: February 25, 2021 04:40 PM2021-02-25T16:40:47+5:302021-02-25T16:41:54+5:30
पीएमसी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
लंडन/मुंबई - पीएमसी बँकेला (Punjab National Bank Scam ) हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या (Nirav Modi ) प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नीरव मोदीसाठी मुंबईतील तुरुंग योग्य आहे, त्याच्याविरोधात भारत सरकारकडून देण्यात आलेले पुरावे त्याला दोषी ठरवण्यासाठी योग्य आहेत, असे सांगत लंडनमधील नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. (Court) त्यामुळे पंजाब नॅशन बँक घोटाळ्यात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईल मोठे यश मिळाले आहे. ( UK extradition judge orders Nirav Modi to be extradited to India to stand trial)
UK extradition judge orders Nirav Modi to be extradited to India to stand trial pic.twitter.com/vsvy4wMqqk
— ANI (@ANI) February 25, 2021
हजारो कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत आज लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत कोर्टाने आपला निकाल सुनावला. यावेळी न्यायाधीशांनी सांगितले की, मी भारत सरकारकडून देण्यात आलेले सर्व साक्षीपुरावे स्वीकारले आहेत. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत, त्यामुळे या पुराव्यांबाबत मी संतुष्ट आहे.
न्यायाधीश सॅम्युएल गोजी यांनी सांगितले की, नीरव मोदीला भारतामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील हे स्पष्ट आहे. दुसरीकडे नीरव मोदीने आपल्या बचावामध्ये दिलेले पुरावे परस्परांशी जुळत नाहीत. तसेच नीरव मोदीचे प्रत्यार्पण केल्यास त्याच्यासोबत न्याय होणार नाही याचा कुठलाही पुरावा दिसत नाही, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
यावेळी साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचेही निकाल देताना सांगितले. तसेच भारतामधील तुरुंगांची स्थिती ही चांगली असल्याचे सांगत त्याबाबत समाधान व्यक्त केले.