माणुसकीला काळीमा! कोरोनाचं औषध म्हणून दिलं 'विष', तिघांचा मृत्यू; पैशांसाठी असा रचला भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 02:26 PM2021-06-28T14:26:04+5:302021-06-28T14:29:03+5:30
Crime News : कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तीन कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. कर्ज घेतलेल्या पैशांमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिले होते. जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने हे कृत्य केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या इरोडमध्ये ही घटना घडली आहे. करुप्पनकाउंडर (72 वर्षे) यांनी काही महिन्यांपूर्वी आर कल्याणसुंदरम नावाच्या व्यक्तीला 15 लाख रुपये दिले होते. करुप्पनकाउंडर यांनी गरज असल्यामुळे कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले. पैशांची परतफेड करू न शकल्यामुळे कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. कल्याणसुंदरम यांनी सबरी नावाच्या व्यक्तीसोबत एक योजना आखली. यात साबरी यांना आरोग्य विभागाचा कर्मचारी बनवून करुप्पनकाउंडर यांच्या घरी पाठविण्यात आले.
धक्कादायक! आईच्या मृतदेहासमोर दोन्ही भाऊ आपल्या पत्नींसह एकमेकांशी भांडण करू लागले अन्...#Crime#Policehttps://t.co/PyzQJjQdSC
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2021
26 जूनला तिथे जाऊन सबरीने करुप्पनकाऊंडरला विचारले की, कुटुंबातील कोणालाही खोकला, सर्दी इ. आहे का? यानंतर सबरीने जाताजाता काही विषाच्या गोळ्या करुप्पनकाऊंडरकडे दिल्या. यावेळी सबरीने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध असल्याचं सांगितलं. सबरी गेल्यानंतर करुप्पनकाऊंडर, त्यांची पत्नी, मुलगी आणि घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर ते चौघेही बेशुद्ध झाले. शेजार्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच करुप्पनकाऊंडरची पत्नी मल्लिका, मुलगी दीपा आणि काम करणारी महिला कुप्पल यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
धक्कादायक! आईच्या उपचारासाठी सर्व पैसे खर्च केल्याने अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसेच नव्हते शेवटी...#Crime#crimenews#Policehttps://t.co/xYWmDqhQrf
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2021
करुप्पनकाउंडर यांची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर आहे. रविवारी रात्री आरोपी कल्याणसुंदरम आणि साबरी यांना अटक करण्यात आली. दोघांनाही आता 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र कधी कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.
CoronaVirus Live Updates : लज्जास्पद! कोरोनाग्रस्तांची अक्षरश: लूटमार; दिलं जातंय भलं मोठं बिल#coronavirus#Corona#CoronaVaccination#CoronaVaccine#hospitalhttps://t.co/ZDlo1x2ojL
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2021
बापरे! 4 महिने 'तो' कोरोनाशी लढला, बरा झाला अन् रुग्णालयाने दिलेलं 21 कोटींचं बिल पाहून हैराण झाला
कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सर्वच सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरू असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. टिकटॉक (Tiktok) या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर एका व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी आलेला खर्च लोकांना सांगितला आहे. कोरोनामुळे तो 4 महिने रुग्णालयात दाखल होता. त्या कालावधीतील त्याचं बिल तब्बल 20 कोटी 77 लाख रुपये आलं आहे.
बापरे! मुलगी गर्भवती असल्याचं कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हतं, बाळाला जन्म दिल्यानंतर घरच्यांना बसला मोठा धक्का#pregnancyhttps://t.co/9ucVApyo7g
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2021