घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:31 PM2021-07-12T20:31:30+5:302021-07-12T20:31:57+5:30

Crime News :त्यांच्याकडून १० पत्यांचे कॅट व रोख रक्कम ३४ हजार ४३० रुपये मिळून आली आहे.

Police action on a gambling den running in the house | घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई 

घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई 

Next

मीरारोड - काशीमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरांमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला १० जुलै रोजी माहिती मिळाली की बी-५०१ ,  चैतन्य अरुणोदय हाईट, डॉन बास्को रोड, मीरागाव येथे घरामध्ये जुगार सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील, विजय निलंगे  , रामचंद्र पाटील, वैष्णवी यंबर, कमल चव्हाण  तसेच काशीमीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुल्ला, जरग आणि राकडे यांनी छापा टाकला. घरामध्ये १० स्त्री - पुरुष पैसे लावून तीन पत्त्यांचा जुगार खेळताना सापडले. त्यावेळी त्यांच्याकडून १० पत्यांचे कॅट व रोख रक्कम ३४ हजार ४३० रुपये मिळून आली आहे.

Web Title: Police action on a gambling den running in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.