पोलिसच निघाले लुटारू; उमरखेड येथील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 17:40 IST2019-03-19T17:37:04+5:302019-03-19T17:40:19+5:30
उमरखेड न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसच निघाले लुटारू; उमरखेड येथील धक्कादायक घटना
ठळक मुद्दे ही धक्कादायक घटना उमरखेड तालुक्यातील घडली आहे. आरोपी पोलिसांपैकी एक जण मंगरुळपीर येथील वाहतूक शिपाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यवतमाळ - १२ लाख रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्यात दोन पोलीस कर्मचारीच आरोपी निघाले आहेत. ही धक्कादायक घटना उमरखेड तालुक्यातील घडली आहे. अत्यल्प किंमतीत साडेतीन किलो सोने देण्याची पुण्याच्या इसमाला बतावणी केली होती. चार पैकी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यातील दोन आरोपी पोलीस कर्मचारीच असल्याचं निष्पन्न झालं असल्याने खळबळ माजली आहे. आरोपी पोलिसांपैकी एक जण मंगरुळपीर येथील वाहतूक शिपाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमरखेड न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.