महिलेचे फोटो व्हायरल करणाऱ्यास पोलिसांनी केलं जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:26 PM2019-08-02T13:26:10+5:302019-08-02T13:26:29+5:30
आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये त्याचे बँक खात्यात डिपॉझीट करण्यास त्याचबरोबर कॅश स्वरुपात देण्यास भाग पाडले.
ठाणे : प्रेमसंबंध ठेवण्यास आणि पैसे देण्यास नकार दिला म्हणून कासारवडवलीमधील महिलेचे फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर फ़ोटो व्हायरल करणाऱ्या बोरिवलीतील व्यंकटेश पेंटा (24) याला कासारवडवली पोलिसांनी सहा तासांमध्ये अटक केली. त्याला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यंमाव्दारे महिलेचे फ़ोटो व्हायरल केले आहेत किंवा आणखी काही महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करीत आहे का याचा तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.
तसेच त्याने महिलेकडून 70 हजार रुपये त्याचे बँक खात्यात डिपॉझीट करण्यास त्याचबरोबर कॅश स्वरुपात देण्यास भाग पाडले. शारिरिक व मानसिक त्रास आणि दिवसेंदिवस त्याची पैशांची हाव वाढल्याने महिलेने त्याचेशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते . याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.