पोलीस असल्याचं म्हणत लुटणाऱ्या भामट्याला अटक; रतन टाटांशी संबंध असल्याचा करत होता दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:57 PM2021-05-29T23:57:43+5:302021-05-29T23:58:58+5:30

Facke Cop Arrested : आरोपीनं तयार केलं होतं पोलिसांचं ओळखपत्र. वसई पोलिसांनी केली अटक

Police arrest robber fake police He was claiming to have a good relationship with ratan Tata and mlas | पोलीस असल्याचं म्हणत लुटणाऱ्या भामट्याला अटक; रतन टाटांशी संबंध असल्याचा करत होता दावा

पोलीस असल्याचं म्हणत लुटणाऱ्या भामट्याला अटक; रतन टाटांशी संबंध असल्याचा करत होता दावा

Next
ठळक मुद्देआरोपीनं तयार केलं होतं पोलिसांचं ओळखपत्रवसई पोलिसांनी केली अटक

पोलीस असल्याचं सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला वसई येथील माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलं. पोलीस असल्याचं सांगत त्या व्यक्तीनं काही लोकांची फसवणूक केली होती, तर अनेकांना लुटण्यासारखे प्रकारही त्यानं केले होते. इतकंच काय तर आपल्या परिचयाच्या असलेल्या एका मैत्रिणीलाही त्यानं लुटलं होतं. त्यानंतर त्या महिलेनं यासंदर्भात तक्रार केली. यावर कारवाई करत वसईतील माणिकपूर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.

पोरस जोखी असं या आरोपीचं नाव असून तो महानगरपालिकेचाही कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्याला महानगरपालिकेचं मोठं कंत्राट मिळालं असून त्यात गुंतवणूक करण्यासही त्यानं अनेकांना सांगितलं. तसंच यानंतर दुप्पट रक्कम परत करण्याचंही त्यानं आमिष दाखवलं. परंतु काही दिवसांनी लोकांनी आपली रक्कम मागितल्यानंतर त्यानं आपण पोलीस असल्याचं सांगत धमकावण्याचे प्रकार केले. 

परंतु यानंतर काही जणांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक आहे. त्यानं पोलिसांत असल्याचं भासवण्यासाठी बनावट ओळखपत्रही तयार करून घेतलं होतं. याशिवाय स्थानक आमदार आणि उद्योगपती रतन टाटा यांच्याशीही आपले चांगले संबंध असल्याचं त्यानं अनेकांना सांगितलं होतं. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Web Title: Police arrest robber fake police He was claiming to have a good relationship with ratan Tata and mlas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.