हडपसरमध्ये गुन्हेगाराचा निर्घृण खून, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:05 PM2022-05-31T12:05:10+5:302022-05-31T13:26:28+5:30

Crime News : मंगेश किशोर शिंगाडे (वय २६, रा. कुमार शिंगाडे कॉलनी, पापडेवस्ती, भेकराईनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Police arrest two suspects in Hadapsar murder case | हडपसरमध्ये गुन्हेगाराचा निर्घृण खून, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात

हडपसरमध्ये गुन्हेगाराचा निर्घृण खून, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात

Next

पुणे : खूनाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणावर तिघा जणांनी कोयत्याने तोंडावर व डोक्यावर सपासप वार करुन निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

मंगेश किशोर शिंगाडे (वय २६, रा. कुमार शिंगाडे कॉलनी, पापडेवस्ती, भेकराईनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना फुरसुंगी येथील भेकराई बस डेपो शेजारील श्री मल्टी पर्पज हॉलच्या समोर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. 

याप्रकरणी राजू विष्णु शिंगाडे (वय ५३, रा. पापडेवस्ती) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश शिंगाडे याच्याविरुद्ध २०१६ मध्ये एक गुन्हा दाखल होता.मंगेश शिंगार्डे हा काल सायंकाळी फुरसुंगी येथील भेकराई बस डेपोशेजारील श्री मल्टी पर्पज हॉलच्या समोर असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केला. त्याच्या तोंडावर व डोक्यावर सपासप वार करुन त्याचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात मंगेश तेथे पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक दिंगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले असून खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read in English

Web Title: Police arrest two suspects in Hadapsar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.