मराठा संवाद यात्रेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 04:13 PM2018-11-26T16:13:36+5:302018-11-26T16:16:38+5:30
विधान भवनाबाहेर हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी या त्यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 7 कार्यकर्त्यांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विधान भवनाबाहेर हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी या त्यांना ताब्यात घेतले आहे.
मराठा आरक्षण जाहीर करण्यात यावं आणि त्याआधीच्या आंदोलनकर्त्यांवरील खटले मागे घेतले जावेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. ताब्यात घेण्यात आलेले सर्व कार्यकर्ते सोलापूरचे जिल्हातील आहेत. महाराष्ट्रातील इतरही काही ठिकाणी मराठा आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या 7 कार्यकर्त्यांना मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विधान भवनाबाहेर हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी या त्यांना ताब्यात घेतले आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 26, 2018