हल्ला होऊन देखील पोलिसांनी इराणी टोळीच्या सराईत आरोपी भावांना केली अटक   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 10:05 AM2020-12-17T10:05:08+5:302020-12-17T10:05:45+5:30

Crime News : पोलीस असल्याची बतावणी करून महिलांना लुटणाऱ्या इराणी टोळीतील दोघा सराईत आरोपी भावांना नवघर पोलिसांच्या पथकाने भिवंडी येथून अटक केली आहे .

Police arrested the accused brothers in an Iranian gang | हल्ला होऊन देखील पोलिसांनी इराणी टोळीच्या सराईत आरोपी भावांना केली अटक   

हल्ला होऊन देखील पोलिसांनी इराणी टोळीच्या सराईत आरोपी भावांना केली अटक   

Next

मीरारोड - पोलीस असल्याची बतावणी करून महिलांना लुटणाऱ्या इराणी टोळीतील दोघा सराईत आरोपी भावांना नवघर पोलिसांच्या पथकाने भिवंडी येथून अटक केली आहे . आरोपींच्या नातलगाने पोलिसांवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली तरी देखील पोलिसांनी आरोपीना पकडून आणले माहिती पोलीस आयुक्तालया कडून प्रसिद्धी पत्रका द्वारे गुरुवारी देण्यात आली . 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी एका ५६ वर्षीय वृद्ध महिलेस आम्ही पोलीस असून , पुढे खून झाल्याचे सांगून दोघांनी तिच्या गळ्यातील १२ ग्रॅमची सोन्याची साखळी काढायला लावून पुडीत ठेवतो सांगून लांबवली होती . पोलीस असल्याची बतावणी करून लुबाडण्याचा वाढत्या घटनां प्रकरणी आरोपीना शोधून काढण्या साठी ठोस पावले उचलण्याचे आदेश आयुक्त सदानंद दाते यांनी दिले होते . 

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे व योगेश काळे यांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला . पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवत त्याची पडताळणी केली असता आरोपी हे इराणी टोळीचे असल्याचे निष्पन्न झाले . ते पिराणी पाडा , भिवंडी आणि आंबिवली ह्या इराणी वस्तीतील राहणारे असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. 

त्यासाठी देवरे व काळे यांच्या नेतृत्वा खाली बाळू राठोड , रवींद्र भालेराव , नवनाथ माने , युनूस गिरगावकर , निलेश शिंदे , संदीप जाधव व पोलीस मित्रांचे पथक नेमण्यात आले . भिवंडीच्या इराणी वस्ती असलेल्या वफा कंपाऊंड मध्ये हे दोन्ही आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या सदर पथकाने १२ डिसेम्बर रोजी  तेथील रहिवाश्यां सारखी वेशभूषा करून खाजगी वाहनातून तेथे गेले . पोलिसांनी सापळा रचून २६ व २३ वर्षीय दोघाही आरोपी भावांना पकडताच त्यांनी आरडाओरडा सुरु केला . 

लागलीच त्यांच्या नातलग व आजूबाजूच्या रहिवाश्यांचा जमावावं जमला आणि पोलिसांना घेरले . पोलिसांनी नेलेल्या गाडीच्या काचा फोडल्या . पोलिसांच्या जीवावर बेतले असताना प्रसंगावधान राखून हुशारीने पोलिसांनी आरोपींना घेऊन सहीसलामत स्वतःची सुटका करून घेतली . 

दोघेही आरोपी पोलीस कोठडीत असून यातील एका आरोपी विरुद्ध दरोडा व चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत . काशीमीरा , पडघा व नारपोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ह्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते . महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याखाली सुद्धा आरोपीवर कारवाई केलेली आहे असे पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे . 

Web Title: Police arrested the accused brothers in an Iranian gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.