पोलिसाला बेड्या, पत्नीच्या खून प्रकरणात कॉन्स्टेबलसह पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:36 PM2020-08-05T19:36:49+5:302020-08-05T19:37:23+5:30
एक महिला फरार : दोन दिवसापूर्वीच फेटाळला अटकपूर्व
जळगाव : पत्नीच्या खून प्रकरणात पती पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र भगवान सोनवणे याच्यासह सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश व दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) या सर्वांना बुधवारी रामानंद नगर पोलिसांनीअटक केली. नणंद सरला देशमुख (रा.परभणी) या महिलेला अद्याप अटक झालेली नाही. दोन दिवसापूर्वीच सत्र न्यायालयाने चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सर्व पर्याय संपल्याने पाचही जण बुधवारी पोलिसांना शरण आले.
आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणाऱ्या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा १० जुलै रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात पती पोलीस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द १३ जुलै रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती या गुन्ह्यात २३ जुलै रोजी खून व हुंडाबळीचे कलम वाढविण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात नरेंद्र सोनवणे याला पोलीस अधीक्षकांनी निलंबन केले आहे. तो एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. अटकेपर्वी या सर्वांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी
रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या
संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!