पोलीसदीदींनी शाळेत शिकवला 'बॅड टच' अन् बलात्कारी बापाला झाली अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 04:52 PM2018-08-02T16:52:48+5:302018-08-02T16:55:42+5:30

अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी केले जेरबंद 

Police arrested rapist father ! | पोलीसदीदींनी शाळेत शिकवला 'बॅड टच' अन् बलात्कारी बापाला झाली अटक!

पोलीसदीदींनी शाळेत शिकवला 'बॅड टच' अन् बलात्कारी बापाला झाली अटक!

Next

मुंबई - अल्पवयीन मुलं असो कि चिमुकली मुलं त्यांच्या निरागसतेचा फाय़दा घेऊन त्यांच्यावर लैंगिक शोषण कारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अश्लिल कृत्य करणाऱ्या नराधम बापाचं बिंग पोलिसदीदी उपक्रमामुळे उघड झालं आहे. पोलिसदीदी कार्यक्रमाअंतर्गत अल्पवयीन मुलींना "गुड टच आणि बॅड  टच" ची माहिती दिली जाते. या माहितीच्याआधारे मुलीला वडिलांकडून अशा प्रकार होणाऱ्या शोषणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आणि आग्रीपाडा पोलिसांनी आरोपीला बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

आग्रीपाडा परिसरात पिडित तरुणी कुटुंबासह राहते. पिडीत मुलगी त्याच परिसरातील एका शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, मुंबईत अल्पवयीन मुलींच्या निरागसतेचा फायदा घेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करण्याचे प्रमाण वाढले होत. या गुन्ह्यांच प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत आठवड्यातून एकदा 'पोलिसदीदी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश हा अल्पवयीन मुला - मुलींना त्यांना चुकीच्या पद्धतीने हात लावणाऱ्यांपासून सावध करणे आहे. तसेच त्यांना लैंगिक शोषणापासून वाचविणे हा आहे. त्यानुसार पिडीत मुलीचा शाळेत काही महिला पोलिसांना पाठवून मुलींना गुड टच आणि बॅड टचची माहिती पोलिसांनी दिली. या माहितीवरून एका १४ वर्षीय तरुणीने आपले वडिलच आपल्यासोबत असे कृत कर असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानुसार एका समाजसेवा संस्थेच्या मदतीने त्या अल्पवयीन तरुणीने बापावरच गुन्हा दाखल केला. पॉक्सो कायद्यान्वये पोलिसांनी त्याला अटक केली असून तो आजपासून न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावलाराम अगवणे यांनी दिली. 

Web Title: Police arrested rapist father !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.