पूर्ववैमनस्यातून हत्या केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 01:54 PM2020-01-23T13:54:28+5:302020-01-23T13:57:47+5:30

दीपकच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर गंभीर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. 

Police arrested six accused in murder case of ulhasnagar | पूर्ववैमनस्यातून हत्या केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पूर्ववैमनस्यातून हत्या केलेल्या सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्य आरोपीवर तद्दीपारीची कारवाई होती अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांची पत्रकार परिषदेत दिली आहे.माणेरे गावातील रहिवासी दिपक भोईर याची हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

उल्हासनगर - दीपक भोईर हत्या प्रकरणी सहा आरोपी काही तासात पोलिसांनी गजाआड केले असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली होती. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून मुख्य आरोपीवर तद्दीपारीची कारवाई होती अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांची पत्रकार परिषदेत दिली आहे.

उल्हासनगरात मध्यरात्रीच्या सुमारास धीरु बारच्या आवारात एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने हत्या झाल्याची घटना समोर आली होती. आठ ते दहा जणांच्या टोळीने हा हल्ला केला. मध्यरात्री धीरु बारच्या आवारात दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाले. माणेरे गावातील रहिवासी दिपक भोईर याची हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

खून करून पळून जाणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांना पकडले, धुळे एलसीबीची कारवाई



नरेश रामसिंग चव्हाण, योगेश सुभाष लाड, राजू मनोहर कनोजीया, अनिकेत विठोबा क्षीरसागर यांनी खून केला. खून केल्यानंतर चौघही आरोपी उल्हासनगर येथून धुळे मार्गे मध्यप्रदेशात एका खाजगी प्रवासी बसने पळून जात होते. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दित हॉटेल द्वारकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ २२ रोजी पहाटे सापळा लावला. खाजगी बसला पाठलाग करून थांबवून त्यात असले संशयित आरोपी यांना चौकशीसाठी मोहाडी पोलीस स्टेशनला नेले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी दीपक भोईर (रा. उल्हासनगर) याचा खून केल्याची कबुली दिली. 

माणेरे गावातील रहिवासी दीपक भोईर नामक तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या धीरु बारच्या आवारात आरोपी नरेश उर्फ बबल्या चव्हाण व त्याच्या सात ते आठ साथीदारांनी तीक्ष्ण हत्याराने दीपकवर जीवघेणा हल्ला केला. यात दीपकच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर गंभीर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. 

 

Web Title: Police arrested six accused in murder case of ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.