सख्या बहिणी निघाल्या पक्क्या चोर; लाखो रुपयांचे दागिने घेऊन झाल्या पसार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 09:07 PM2022-06-11T21:07:08+5:302022-06-11T21:07:19+5:30

एकीकडे डोंबिवली पोलिस तपास करीत असताना सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांची टीम या प्रकरणाचा तपास करीत होती.

Police arrested the sisters for stealing jewelery worth lakhs of rupees at Dombivali | सख्या बहिणी निघाल्या पक्क्या चोर; लाखो रुपयांचे दागिने घेऊन झाल्या पसार 

सख्या बहिणी निघाल्या पक्क्या चोर; लाखो रुपयांचे दागिने घेऊन झाल्या पसार 

Next

डोंबिवली:  एका बंद घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड चोरी करुन पसार झालेल्या तिघी सख्या बहिणींना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने अटक केली आहे. सारीका सकट, सुजाता सकट आणि मिना इंगळे अशी या तिघींची नावे आहेत. या तिघीही सराईत चोरटय़ा असल्याचे समोर आले आहे. 

डोंबिवलीतील चित्तरंजन दास रोड परिसरात असलेल्या आशिष निळकंठ इमारत राहणा:या चैताली शेट्टी या 2 जून रोजी सकाळी आठ वाजता घराला कुलूप लावून कामावर गेल्या. संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड गायब होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. एकीकडे डोंबिवली पोलिस तपास करीत असताना सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांची टीम या प्रकरणाचा तपास करीत होती. सीसीटीव्हीत तीन महिला दिसून आल्या. ज्यांच्यावर पोलिसांचा संशय होता.

पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या आधारे या तिघींची ओळख पटविली. या तिघी कुर्ला येथे राहता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा मोबाईल नंबर शोधून काढला. मोबाईल नंबर ट्रेस आउट केला असता त्यांचे लोकेशन समजून आले. अखेर या तिघींनी पुणे येथील जेजूरी नजीक पुरंदर येथून अटक करण्यात आली. तिघीही सख्या बहिणी आहे. त्यापैकी दोघींनी एकाशी लग्न केले आहे. याचा ट्रक रिकॉर्ड समोर आला आहे. त्यांच्याकडून चोरीस 23 तोळे सोने, मोबाईल आणि रोकड हस्तगत केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाट यांनी दिली आहे.

Web Title: Police arrested the sisters for stealing jewelery worth lakhs of rupees at Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.