पोलिसांनी पकडला खानदानी चोर, कुटुंबच नाही संपूर्ण गावच चोरटे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:49 PM2019-09-16T14:49:34+5:302019-09-16T14:50:04+5:30
भुरटे चोर, चोरट्यांची टोळी आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत तुम्ही ऐकले असेलच. पण तुम्ही कधी एखाद्या खानदानी चोराबाबत ऐकलं आहे का ज्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावच चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहे.
नवी दिल्ली - भुरटे चोर, चोरट्यांची टोळी आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत तुम्ही ऐकले असेलच. पण तुम्ही कधी एखाद्या खानदानी चोराबाबत ऐकलं आहे का ज्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावच चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहे. दिल्लीमधील बाडा हिंदूराव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी एका अशा खानदानी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ज्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गावच चोरीच्या गुन्ह्यांत गुंतलेले आहे.
लहानपणापासून गावातील लोकांना चोरी करताना पाहून मी चोरी करायला शिकलो, अशी कबुली या चोराने दिली. दरम्यान, त्याच्या जबानीची खातरजमा करण्यासाठी त्याच्या गावाजवळी पोलिसांशी संपर्क साधला असता तेथील पोलिसांनीसुद्धा या गावातील चोरांमुळे आपण त्रस्त असल्याचे सांगितले. दरम्यान, डीसीपी नॉर्थ मोनिका भारद्वाज यांनी आरोपीने केलेल्या दाव्यांची पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीविरोधात दिल्लीमध्ये केवळ तीन गुन्हे असल्याचे समोर आले आहे. चिंटू असे या आरोपीचे नाव असून, तो बिहारमधील राहणणार आहे. टोळीसह मिळून दुचाकीच्या डिक्कीतून सामान चोरी करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. औद्योगिक वसाहती असलेल्या भागात जाऊन तो रेकी करत असे. त्यानंचर लोखंडापासून बनवलेल्या एका उपकरणाच्या माध्यमातून तो डिक्कीचे लॉक उघडून आतील सामान लंपास करत असे. दरम्यान, आपण धावत्या दुचाकींचीसुद्धा डिक्की फोडून त्यातून सामान लंपास करायचो, असा दावा आरोपी करत आहे.