बनावट कागदपत्रांद्वारे २ कोटींपेक्षा अधिक कर्ज काढून बँकांना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 08:41 PM2019-07-26T20:41:49+5:302019-07-26T20:43:53+5:30
दोघांना न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई - बोगस कागदपत्रांद्वारे बँक अकाउंट उघडून त्यानंतर विविध बँक आणि वित्तीय संस्थांकडून वैयक्तिक तसेच गृहकर्ज प्राप्त अरुण त्या कर्जाची परतफेड न करता बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने जेरबंद केले आहे. अटक आरोपींची नावे सुशांत आयरे (२९) आणि चेतन कावा (३६) अशी आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, आयडीबीआय बँक , एचडीएफसी बँक, इन्क्रेड फायनान्शियल सर्व्हिसेस लि., टाटा कॅपिटल हौ. फायनान्स लि., एडेलवीज हौ. फायनान्स लि., आदित्य बिर्ला कॅपिटल, फुलटॉर्न, इंडिया बुल्स आदी बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडून एकूण १७ प्रकरणांत आरोपींनी २ कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केली. अटक आरोपींनी कांजूरमार्ग, विरार, भाईंदर, मीरा रॉड इत्यादी ठिकाणी भाड्याने घरे घेऊन तेथील पाट्यावरील भाडेकराराची कागदपत्रे तयार करून त्याआधारे सिम कार्डसह पण कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे तयार करून बँकांची फसवणूक केली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
मुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे २ कोटींहून अधिक कर्ज काढणारी दुकली अटकेत https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 26, 2019