पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं मन, पत्नीने त्याच मैत्रिणीसोबत मिळून त्याचं शीर धडापासून केलं वेगळं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 04:22 PM2022-05-24T16:22:07+5:302022-05-24T16:23:44+5:30
Hooghly Crime News : हुगलीमध्ये काही दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरूण शुभज्योति बसुची हत्या करण्यात आली होती आणि त्याचं कापलेलं शीर पोलिसांना आढळून आलं होतं.
पश्चिम बंगालच्या (West Bengal) हुगलीमध्ये (Hooghly) पोलिसांनी हत्येच्या एका केसचा (Murder Case) असा काही खुलासा केला ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. प्रेम आणि आवडीवरून एका महिलेने आपल्या मित्रांनासोबत घेऊन पतीची हत्या केली. चौकशीतून जेव्हा या प्रकरणाबाबत वेगवेगळे खुलासे झाले तेव्हा सगळेच हैराण झाले होते.
हुगलीमध्ये काही दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरूण शुभज्योति बसुची हत्या करण्यात आली होती आणि त्याचं कापलेलं शीर पोलिसांना आढळून आलं होतं. आता पोलिसांनी तरूणाच्या हत्येप्रकरणी मृतकाची पत्नी चंदना, तिची मैत्रीण पूजा चॅटर्जी, भास्कर अधिकारी आणि मैत्रिणीची पती सुवीर अधिकारी यांना अटक केली आहे.
प्रकरणाची माहिती देत चंदननगरचे पोलीस अधिकारी डीसीपी डॉ. अरविंद आनंद यांनी सांगितलं की, दीड महिन्याआधी पानीहाटी येथे राहणाऱ्या शुभज्योति बसुने एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. यादरम्यान त्याची ओळख पत्नीची मैत्रीण शर्मिष्ठा सोबत झाली होती.
शर्मिष्ठाला भेटल्यावर शुभज्योतिने आपल्या पत्नीला सोडलं आणि तिला प्रेमाचा प्रस्तावर दिला. हे तिला अजिबात पटलं नाही. तिने हे सगळं पती सुबीर आणि मैत्रीण व शुभज्योतिची पत्नी पूजाला सांगितलं. हे समजल्यावर शर्मिष्ठाचा पती आणि शुभज्योतिची पत्नी पूजा संतापले. त्यांनी शुभज्योतिला एक खतरनाक धडा शिकवण्यासाठी प्लान केला.
प्लाननुसार, शुभज्योतिला आधी हुगलीच्या उत्तरपारामध्ये बोलवण्यात आलं आणि तिथे कोननगर वीटभट्टीमध्ये त्याला दारू पाजण्यात आली. दारूची नशा चढल्यानंतर शुभज्योति बसुचं शीर शर्मिष्ठाचा पती सुबीरने धारदार हत्याराने धडापासून वेगळं केलं.
आरोपींनी शुभज्योतिचं शीर नदीत फेकलं आणि धड व्हॅनमध्ये टाकून दिल्ली रोडवर त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी दावा करत सांगितलं की, पोलिसांसाठी ही केस मर्डर मिस्ट्री ठरत होती आणि अंधारात तीर चालवत होतो. कारण घटनास्थळी पोलिसांनी एकही पुरावा सापडला नाही.
अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मृतकाच्या हातावरील टॅटू पाहिला तेव्हा त्यांनी ओळख पटवली. त्यानंतर त्यांना मृतदेह बघण्यासाठी बोलवण्यात आलं. मृतकाची ओळख पटताच केस सोपी झाली आणि पोलिसांनी हत्येच्या आरोपात पत्नी, तिची मैत्रीण आणि मैत्रिणीचा पती या तिघांना अटक केली.