Video : पोलीस बनला देवदूत; लोकलखाली जाणाऱ्या प्रवाश्याचे वाचवले प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 09:28 PM2019-10-01T21:28:08+5:302019-10-01T21:31:56+5:30

घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Police become god; Rescued passenger lives | Video : पोलीस बनला देवदूत; लोकलखाली जाणाऱ्या प्रवाश्याचे वाचवले प्राण 

Video : पोलीस बनला देवदूत; लोकलखाली जाणाऱ्या प्रवाश्याचे वाचवले प्राण 

Next
ठळक मुद्दे जीव वाचवल्याबद्दल पंकज आणि रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे. तुषार गजानन देवरुखकर (42) असे त्याचे नाव असून तो विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथील न्यू अनुरुध्य सोसायटीच्या सदनिका नंबर 204 मध्ये राहतो.

नालासोपारा - सोमवारी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांची प्लॅटफॉर्म नंबर 3 च्या विरारहून चर्चगेटला जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी धावणारा प्रवाशी पडला आणि लोकल ट्रेनसोबत फरफटत जात होता. त्याचवेळी ड्युटीवर तैनात असणाऱ्या शीघ्र दलाचा रेल्वे पोलीस कर्मचारी पंकज कुमार यांनी पाहिले व धावत जाऊन प्रवाशाला बाजूला खेचून त्याचा जीव वाचवला आहे.

या दुर्घटनेत प्रवाशाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने पंकजने जखमी प्रवाशाला डॉक्टरकडे नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्या प्रवाशाची विचारपूस केल्यावर तुषार गजानन देवरुखकर (42) असे त्याचे नाव असून तो विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथील न्यू अनुरुध्य सोसायटीच्या सदनिका नंबर 204 मध्ये राहतो. त्याचा जीव वाचवल्याबद्दल पंकज आणि रेल्वेपोलिसांचे आभार मानले आहे. सदर घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
 

Web Title: Police become god; Rescued passenger lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.