पोलिसांनीच कायदा मोडला; अल्पवयीन मुलीचा चौकीतच विवाह लावला

By पूनम अपराज | Published: November 26, 2020 09:57 PM2020-11-26T21:57:24+5:302020-11-26T21:58:01+5:30

UP Police : मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीपासूनच एक मुलगी घरातून बेपत्ता होती. नंतर तिने प्रियकरासह पोलीस चौकी गाठली असल्याचे उघड झाले.

The police broke the law; The minor girl got married in the chowki | पोलिसांनीच कायदा मोडला; अल्पवयीन मुलीचा चौकीतच विवाह लावला

पोलिसांनीच कायदा मोडला; अल्पवयीन मुलीचा चौकीतच विवाह लावला

googlenewsNext
ठळक मुद्देवैद्यकीय चाचणीतून तिचे वय निश्चित केले जाईल. ती अल्पवयीन नसल्यास त्यानुसार पोलिस कारवाई करतील, परंतु एखादी अल्पवयीन असल्यास आरोपींविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे सहजनवां पोलीस स्टेशन परिसरातील घघसरा चौकी प्रभारीने एका अल्पवयीन मुलगा आणि मुलीला चौकीत लग्न लावून देऊन मदत केली आहे. ते दोघेही प्रौढ असल्याचा व्हिडिओत संदर्भ देत होते, पण आता काही कागदपत्रे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पूस लावून मुलीला पळवून नेल्याचा  गुन्हा दाखल केला आणि मुलीला ताब्यात घेतले. दुसरीकडे एसएसपीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी एएसपीकडे सोपविली आहे. तपासाच्या आधारे कारवाई केली जाईल असे एसएसपीचे म्हणणे आहे.

 
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीपासूनच एक मुलगी घरातून बेपत्ता होती. नंतर तिने प्रियकरासह पोलीस चौकी गाठली असल्याचे उघड झाले. त्या दोघांनीही म्हटलं होतं की, ते प्रौढ आहेत. असा आरोप आहे की, चौकी प्रभारीने दोघांचे लग्न लावून दिले. जेव्हा मुलीच्या आईने पोलिसात अल्पवयीन मुलीचे चौकीत लग्न केल्याचा आरोप केला. तेव्हा ही बाब अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्या इन्स्पेक्टरने कागदपत्रे मागितली होती, जेणेकरून ती मुलगी प्रौढ आहे की नाही याची माहिती मिळू शकते. परंतु असे दिसून आले की, तिने अर्धवट शाळा सोडली, ज्यामुळे कागदपत्रे सापडली नाहीत. जुन्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन असल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एसएसपी जोगेंद्र कुमार यांनी सांगितले की, कागदपत्रे मागितली गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीला तिच्या घरी रहायचे नाही. वैद्यकीय चाचणीतून तिचे वय निश्चित केले जाईल. ती अल्पवयीन नसल्यास त्यानुसार पोलिस कारवाई करतील, परंतु एखादी अल्पवयीन असल्यास आरोपींविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. एएसपी पोलिसांनी लावून दिलेल्या लग्नाबाबत देखील तपास घेत आहेत.

Web Title: The police broke the law; The minor girl got married in the chowki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.