खळबळजनक! पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 20:01 IST2021-07-07T20:00:59+5:302021-07-07T20:01:51+5:30
Police Officer Committed Suicide : प्रशांतचा मृतदेह अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या घटनेचा तपास अलिबाग पाेलिस करत आहेत.

खळबळजनक! पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
रायगड - अलिबाग शहरातील पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशांत जगजीवन ठाकूर (35) असे आत्महत्या केलेल्या पाेलिस जवानाचे नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.
प्रशांत यांने अलिबाग-शिवाजी नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. सकाळी नियमीतपणे प्रशांत कामावर आला नाही. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला माेबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच वेळ त्याच्याकडून फाेन उचलण्यात येत नव्हता. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी प्रशांतचे घर गाठल्यानंतर सर्व प्रकार समाेर आला, असे सूत्रांनी सांगितले. प्रशांतचा मृतदेह अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या घटनेचा तपास अलिबाग पाेलिस करत आहेत.