ठाणे: लाच मागितलेल्या पोलिस काँन्टेबलला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 10:44 PM2021-06-16T22:44:14+5:302021-06-16T22:44:43+5:30
मुंब्रा पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल उदय किरपण याला नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्राः गुटखा विक्री करणा-यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याच्याकडे १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल उदय किरपण याला नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी अटक केली.
गुटखा विक्री करणारा या तक्रारदार आणि त्यांचे भाऊ यांचे विरुद्ध गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात त्यांना अटक न करण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असलेल्या किरपण याने १ लाख २० हजार इतक्या रकमेची लाच मागितली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ५0 हजार स्वीकारण्याचे ठरले होते.
दरम्यान विक्रेत्याने याबाबातची तक्रार नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. पडताळणी अंती सदर पोलिसाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्याच्या विरोधात बुधवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करुन त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या डीवायएसपी ज्योती देशमुख यांनी लोकमतला दिली.