मीरा भाईंदरमध्ये नशेडींवर पोलिसांची धडक कारवाई; १४ गुन्हे दाखल

By धीरज परब | Published: October 16, 2023 07:15 PM2023-10-16T19:15:24+5:302023-10-16T19:15:44+5:30

मीरारोड - नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांनी  नशेडीं सह दारूचे गुत्ते चालवणाऱ्या हॉटेलवाल्यांवर रावीविणारी रात्री सदरा कारवाई केली. भाईंदर पोलिसांनी ८, ...

Police crackdown on drug addicts in Mira Bhayander; 14 cases filed | मीरा भाईंदरमध्ये नशेडींवर पोलिसांची धडक कारवाई; १४ गुन्हे दाखल

मीरा भाईंदरमध्ये नशेडींवर पोलिसांची धडक कारवाई; १४ गुन्हे दाखल

मीरारोड - नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांनी  नशेडीं सह दारूचे गुत्ते चालवणाऱ्या हॉटेलवाल्यांवर रावीविणारी रात्री सदरा कारवाई केली. भाईंदर पोलिसांनी ८, नवघर व नया नगर पोलिसांनी प्रत्येकी ३ गुन्हे दाखल केले आहेत. 

रविवारी रात्री भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुगुट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भाईंदर मधील विविध चायनीज हॉटेल जवळ मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या ओमकार विनायक कवडे , क्लिफ वॉल्टर डिसिल्वा , आकाश एकनाथ गुरव , सारंग हनुमंत गोळे, सचिन गोपीचंद पवार व आदेश एकनाथ गुरव ह्या ६ जणांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले. 

मुर्धा गाव मस्जिद जवळील चायनीज खाद्य पदार्थ हॉटेलात लोकांना दारू पिण्यासाठी बसायला देऊन दारूचा गुत्ताच करून टाकल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी वैभव प्रमोद पाटील रा. मुर्धा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर आणखी एका गुन्ह्यात बेकायदा विक्रीसाठी केलेला दारूचा साठा जप्त केला आहे . 

मीरारोडच्या नया  नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या शिवराम राजमनी मिश्रा ( ५९ ) , खुर्शीद मकसूद हाशमी ( ४३ )  , इरफान मोहम्मद नासिर अहमद ( २३ ) ह्या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भाईंदर पूर्व हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणारे  हर्ष सुरेंद्र जांगीड ( १८ ) , सनी अशोक बागवे ( २७ ) , आकाश दिलीप भौमिक ( २६ ) ह्या तिघांना पकडत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. 

Web Title: Police crackdown on drug addicts in Mira Bhayander; 14 cases filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.