Police Crushed to death: 'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 02:08 PM2022-07-20T14:08:24+5:302022-07-20T14:09:35+5:30

Police Crushed to death: हरियाणा-झारखंड आणि गुजरातमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना ट्रक-डंपरखाली चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे.

Police Crushed to death: Three police officers on duty were crushed to death in the last 24 hours in Gujarat, Haryana and Jharkhand | Police Crushed to death: 'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या

Police Crushed to death: 'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या

googlenewsNext

नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासांत तीन पोलिसांना ट्रक-डंपरने चिरडून ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. गुजरातच्या आनंदमधून एक ताजे प्रकरण समोर आले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी हरियाणातील डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांना खडीच्या डंपरने चिरडल्याची घटना घडली. तसेच, झारखंडमधील महिला पोलिस एसआय संध्या टोपने यांचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील आनंद येथे मंगळवार मध्यरात्री वाहतूक पोलिस राजकिरण यांना ट्रकने चिरडले. माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेले कृत्य? याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत. पोलिसांनी गाडी जप्त केली असून, आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे.

झारखंडमध्ये महिला पोलिसाची हत्या
याआधी बुधवारी पहाटे 3 वाजता झारखंडमधील रांचीमध्ये महिला पोलीस एसआय संध्या टोपने यांचा पिकअप व्हॅनच्या धडकेने मृत्यू झाला. रांची एसएसपी म्हणाले की, प्राण्यांची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून रात्री वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली होती, यावेळी पोलिसांच्या पथकाने पिकअप व्हॅनला थांबवण्याचा इशारा दिला तेव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवून महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले. या घटनेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गाडीसह एका आरोपीला अटक केली आहे.

हरियाणात DSPचा मृत्यू
दुसरीकडे, हरियाणातील नूह जिल्ह्यात मंगळवारी दुपारी तवादचे डीएसपी सुरेंद्र सिंह बिश्नोई यांची चिरडून हत्या करण्यात आली. पाचगाव टेकडी परिसरात सुरू असलेले दगडाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी पोलीस अधिकारी गेले होते. कागदपत्रे तपासण्यासाठी डीएसपींनी एका डंपर-ट्रकला थांबण्याचा इशारा दिला, मात्र चालकाने वेग वाढवत त्यांना चिरडले. या घटनेनंतर आरोपीला पकडण्यात आले. 
 

Web Title: Police Crushed to death: Three police officers on duty were crushed to death in the last 24 hours in Gujarat, Haryana and Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.