पोलिसांचा राहिला नाही धाक : पिंपरीत घरफोड्यांचे वाढले प्रकार, एकाच दिवसात आठ घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:08 AM2019-03-18T03:08:02+5:302019-03-18T03:08:21+5:30

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊनही गुन्हेगारी कमी झालेली नाही. घरफोडी, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.

 Police did not live up to the danger: increased type of houseflight in the pig, eight incidents in one day | पोलिसांचा राहिला नाही धाक : पिंपरीत घरफोड्यांचे वाढले प्रकार, एकाच दिवसात आठ घटना

पोलिसांचा राहिला नाही धाक : पिंपरीत घरफोड्यांचे वाढले प्रकार, एकाच दिवसात आठ घटना

googlenewsNext

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊनही गुन्हेगारी कमी झालेली नाही. घरफोडी, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
एकाच दिवशी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आठ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, यामध्ये दोन एटीएम मशीन फोडण्यासह मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याच्या घटनेचाही समावेश आहे. वाहनांची तोडफोड करण्याचेही सत्र सुरूच असल्याने शहरवासीय भीतीच्या छायेत आहेत. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय १५ आॅगस्टपासून २०१८ पासून सुरू करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी मिळण्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढल्याने गुन्हेगारी कमी होऊन कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मदत होईल, असे बोलले जात होते. शनिवारी एकाच दिवशी घरफोडीच्या सात गुन्ह्यांसह दरोडा व तोडफोडीच्या गुन्ह्यांचीही नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे.

अशा घडल्या आठ घटना

संभाजीनगरातील मंदिरातील दानपेटी फोडून २० हजार केले लंपास
1चिंचवड, संभाजीनगर येथील साई गार्डनमधील साईबाबा मंदिरामधील दानपेटी आरोपींनी फोडली. मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी चोरून मंदिराच्या मागील बाजूस नेली. तेथे दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील २० हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी सतीश बाबूराव सराटकर (वय ६५, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.

चिंचवडमधील शिवदर्शन कॉलनीत घरफोडी, ५० हजार लंपास
2यासह चिंचवड, मोहननगर येथील शिवदर्शन कॉलनी येथील मधुकर विठ्ठल मोरे (वय ४२) यांचे घराच्या दरवाजाच्या कडी उघडून आत शिरलेल्या चोरट्याने ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन ते पाच या वेळेत घडली.

मोहननगर परिसरातील मेडिकल दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला
3चिंचवड, मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमागे असलेल्या मेडिकल दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी ३९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अक्षय अनिल लुंकड (वय ३१, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. या दोन्ही घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद निगडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

स्टेट बँकेच्या भोसरी, धावडेवस्ती येथील एटीएमचे नुकसान
4यासह पुणे-नाशिक रोडवरील धावडेवस्ती येथील स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या एटीएम सेंटरमधील दोन एटीएमच्या मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापून एटीएम फोडले. एका मशीनमधून २०,१८,४०० रुपये तर दुसऱ्या मशीनमधून १५,७, ७०० रुपये असा एकूण ३५,२६, १०० रुपयांची रोकड लंपास केली. घटनेत दोन्ही मशीनचेही नुकसान झाले. घटना शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.

चाकण, खराबवाडीतील वर्कशॉप दुकान फोडले अ‍ॅल्युमिनिअमचे साहित्य गायब
5चाकण, खराबवाडी येथील बालाजी इंटरप्रायजेस नावाच्या वर्कशॉपचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्याने वर्कशॉपमधील अ‍ॅल्युमिनिअम धातूच्या बॉशप्लेट व टॉपप्लेट असा एकूण २ लाख ४७ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला.
धामणेतील किर्लोस्कर व्यवस्थापन महाविद्यालयात लॅपटॉप लंपास
6धामणे येथील किर्लोस्कर इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट स्टडीज कॉलेज पीजीपी हॉस्टेलमधील १०५ क्रमांकाच्या रूममधून चोरट्याने २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दीडच्या सुमारास घडली.

घर बंद असताना किवळेत कडीकोयंडा उचकटून चोरी
7घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून
घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील
१० हजार रुपये रोख व एक तोळ्याची सोनसाखळी व ५ ग्रॅम वजनाची अंगठी चोरट्याने लंपास केली. ही घटना किवळेतील राजारामनगर येथे घडली.

बावधानला सदनिका फोडून लांबवले हिऱ्यांचे दागिने
8बावधान खुर्द येथील आमची कॉलनी येथील अपूर्वगड अपार्टमेंट मधील फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरटा आता शिरला. चोरट्याने बेडरूममधील लाकडी कपाटातील ६ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे व हिºयाचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संतप्त नागरिकांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या
चिंचवड : चिखलीमध्ये दहशत माजविणाºया गुंडांनी काल या भागात दुकानांमध्ये घुसून तोडफोड केली. या गुंडांच्या त्रासाने संतप्त झालेले नागरिक अखेर एकजूट करीत रस्त्यावर उतरले. परिसरात दहशत माजविणाºया गुंडांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. स्थानिक पोलीस प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याने या नागरिकांनी चिंचवडमधील पोलीस आयुक्तालय गाठले रात्री दहा वाजता अनेक नागरिक आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन बसले.
परिसरात गुंडांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. भांडणे, लूटमार, मारामाºया, वाहनांची तोडफोड, महिला व विद्यार्थिनींची छेड-छाड, हप्ते वसुली असे प्रकार वाढल्याने नागरिक संतप्त झाले होते. या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घ्यावी तसेच येथील गुन्हेगारी मोडीत काढावी व दहशत करणाºया गुंडांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालयासमोर बसण्याची भूमिका नागरिकांनी घेतली.

आरोपी अज्ञातच, शोध कधी?
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील निगडी ठाण्यात २ तर भोसरी, चाकण, पिंपरी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, हिंजवडी या ठाण्यांमध्ये प्रत्येकी १ अशा प्रकारे शनिवारी एकाच दिवशी एकूण ८ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, या सर्व गुन्ह्यांतील चोरटे अज्ञात असून, पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहोचणार कधी? असा सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ
दहशत माजविण्यासाठी वाहन तोडफोडीसह दुकानांची तोडफोड करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शनिवारीदेखील चिखलीतील घरकुल परिसरात टोळक्याकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली. यासह काही दिवसांपूर्वीच पिंपरीतील एचए मैदानाजवळील रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
भर रस्त्यात सपासप वार
शुक्रवारी पहाटे किरकोळ कारणावरून पिंपरीतील डीलक्स चौकात तरुणावर भर रस्त्यावर टोळक्याने सपासप वार केले. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title:  Police did not live up to the danger: increased type of houseflight in the pig, eight incidents in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.