पोलिसांनी उद्ध्वस्त केला नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 07:35 PM2021-03-05T19:35:08+5:302021-03-05T19:50:33+5:30
Naxal Weapon Factory busted by Police : अबुझमाडच्या जंगलात गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांची संयुक्त कारवाई
गडचिरोली : गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवरील नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबुझमाडच्या जंगलात दोन्ही राज्याच्या पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धुमश्चक्रीत नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. अजूनही हे ऑपरेशन सुरूच आहे.
गेल्या 48 तासापासून त्या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये 3 वेळा चकमकी उडाल्या. यादरम्यान एक पोलीस जवान जखमी झाला आहे, पण त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. काही नक्षलवादी मारले गेल्याची शक्यता आहे, पण पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. काही नक्षलवादी मारले गेल्याची शक्यता आहे, पण पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
शुक्रवारी सकाळी दोन हेलिकॉप्टरने अतिरिक्त पोलीस कुमक रवाना करण्यात आली. छत्तीसगड सीमेतील नक्षलवाद्यांच्या गडात घुसून कारवाई करण्याची गडचिरोली पोलिसांची ही 3 वर्षातील दुसरी कारवाई आहे. ही चकमक अजून सुरूच असून नेमका किती शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला त्याची माहिती हे ऑपरेशन थांबल्यानंतरच कळू शकेल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.